Thoughts after Breakup : ब्रेकअप झाल्यामुळे एकटेपणा सतावतोय? या सोप्या टिप्स करतील जादू

प्रेमात ब्रेकअप झाल्यावर अनेकजण कोशात जातात आणि काय करावं हे त्यांना समजत नाही. त्यामुळे ते एकटे पडतात. हा एकटेपणा दीर्घकाळ राहिला, तर तो अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता असते.

Thoughts after Breakup
ब्रेकअपमुळे एकाकी वाटणाऱ्यांसाठी टिप्स  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ब्रेक-अपनंतर वाटतं एकाकी
  • अनेकांना होतो आठवणींचा त्रास
  • सोपे उपाय करतील बाहेर पडायला मदत

Thoughts after Breakup : एकमेकांच्या प्रेमात पडणे आणि त्यानंतर ब्रेकअप होणे, या घटना अनेकांच्या आयुष्यात घडत असतात. विशेषतः तरुण वयात अनेकजण एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर काही काळाने आपलं एकमेकांशी जमत नाही, हे लक्षात आल्यावर वेगळे होण्याचा निर्णय घेतात. जेवढा काळ या दोन व्यक्ती एकमेकांच्या नात्यात गुंतलेल्या असतात, तेवढा काळ आपल्या भावना आणि आयुष्यातील मौल्यवान वेळ दोन्ही त्यावर खर्च केलेला असतो. या नात्याकडून भविष्याची स्वप्नंही रंगवली जातात आणि आपलं नातं दीर्घकाळ टिकून राहिल, अशी अपेक्षा केली जाते. प्रत्यक्षात मात्र तसं घडत  नाही आणि अचानक ब्रेकअपला सामोरं जावं लागतं. त्यावेळी अनेकांना या परिस्थितीला कसं हाताळावं, तेच समजत नाही. नात्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया ही केवळ शारीरिक नसते, तर ती मानसिकही असते. नातं 

तुटल्यानंतरही एकमेकांसोबत घालवलेले क्षण, आठवणी या फेर धरून समोर नाचू लागतात आणि त्याच्या विळख्यात अनेकजण अडकून पडतात. अशा काळात इतर कुणालाही भेटायचं ही मंडळी टाळतात आणि एकटं राहणंच पसंत करतात. मात्र हा एकटेपणा त्यांच्या समस्येत जास्तच भर घालतो. हा एकटेपणा संपवणं हेच खरं ब्रेकअपनंतरचं आव्हान असतं. काही सोप्या उपायांनी हा एकटेपणा संपवता येऊ शकतो. जाणून घेऊया असेच काही उपाय

इतरांशी संवाद साधा

तुमच्या मनातलं विश्वासानं बोलू शकता, अशा सर्वांकडे तुमचं दुःख व्यक्त करा. आपल्या ब्रेकअपबद्दल कुणाशीच बोलू नये, असं तरुणांना वाटत असतं. त्यामुळे आपली प्रतिष्ठा कमी होईल किंवा आपलं हसं होईल, असा त्यांचा समज असतो. त्यामुळे शक्यतो ही बाब लपवण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जातो. प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. त्यामुळे आपल्या जवळच्या मित्रांकडे, कुटुंबीयांशी मनमोकळेपणानं बोलायला सुरुवात करा. 

अधिक वाचा - Raksha Bandhan Sweet Recipes: रक्षाबंधनाला 15 मिनिटांत बनवा पारंपारिक पदार्थ, 'ही' आहे सोपी रेसिपी

आठवणींतून बाहेर पडा

आपला ब्रेकअप झाला आहे, ही वस्तुस्थिती अनेकजण स्विकारू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती स्विकारणं अतिशय गरजेचं आहे. सत्य परिस्थिती स्विकारा आणि जुन्या आठवणींच्या पाशातून बाहेर पडून खऱ्या जगात जगण्याचा प्रयत्न करा. जुन्या आठवणी उगाळत बसू नका. तुमच्या पार्टनरला दोष देऊन त्याला किंवा तिला धडा शिकवण्याचा विचारही मनात आणू नका. 

अधिक वाचा - Vastu Tips: चुकीच्या दिशेस झोपल्याने पती-पत्नीमध्ये निर्माण होतो दुरावा, पाहा कोणत्या दिशेस झोपू नये...

स्वतःसोबत वेळ घालवा

ब्रेकअपनंतर सर्वांशी नातं तोडणे आणि कुणाहीसोबत आपल्या भावना शेअर न करणे या प्रकारामुळे तुम्हाला मानसिक विकारांना सामोरं जावं लागू शकतं. ब्रेकअप झाल्यावर कामातूनही थोडा ब्रेक घ्या आणि एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी मित्रांसोबत वेळ घालवा. त्याचप्रमाणे स्वतःला स्वतःसाठी वेळ द्या आणि लॉजिकल विचार करून निगेटिव्ह भावनांपासून स्वतःला तोडून टाका. तुम्हाला आवडणारं कुठलंही काम, छंद यात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. 

डिस्क्लेमर - ब्रेकअपनंतरचा एकटेपणा घालवण्यासाठीच्या या सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला जर काही गंभीर मानसिक समस्या असेल. तर मात्र मानसोपचारतज्ज्ञांना भेटून योग्य ते उपचार घेणं गरेजचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी