वैवाहिक जीवन होईल अधिक आनंदाचे, १०१ वर्षाचे आजोबा आणि ९० वर्षांच्या आजीने दिल्या या टिप्स

लाइफफंडा
Updated Apr 07, 2021 | 18:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

या दोघांनी एकत्र आपल्या आयुष्यातील ७२ ऋतू पाहिले आहेत आणि ते सांगतायत की कशाप्रकारे आपले आयुष्य सुखी आणि आनंदी बनवू शकता. त्यांनी काही टिप्सही दिल्या आहेत.

married life
वैवाहिक जीवन होईल अधिक आनंदाचे, फॉलो करा या टिप्स 

थोडं पण कामाचं

  • १०१ वर्षांचे आजोबा आणि ९० वर्षांच्या आजीच्या काही खास टिप्स
  • वैवाहिक जीवन आनंदमय बनवण्यासाठी दिल्या टिप्स
  • सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव

मुंबई: असं म्हणतात की लग्नाच्या जोड्या स्वर्गात ठरवल्या जातात. मात्र सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सात फेरे घेतल्यानंतर कितीजण हे निभवतात हा मोठा विषय आहे. अनेकदा आपण पती आणि पत्नी यांच्यात भांडणाच्या गोष्टी ऐकत असतो कधी कधी परिस्थिती इतकी खराब होते की गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचते. मात्र यातच १०१ वर्षांचे आजोबा आणि ९० वर्षांच्या आजी यांचे वैवाहिक जीवन खरंच अचंबित करणारे आ आहे. या दोघांनी ७२ पावसाळे एकत्र पाहिले आहेत. 

वृद्ध दाम्पत्याने सांगितला अनुभव

७२ वर्षांपासून एकत्र असलेल्या या दाम्पत्याने ह्युमन्स ऑफ बॉम्बेकडून शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामवर एक क्लिप शेअर केली आहे. यात त्यांनी आपली कहाणी शेअर केली आहे. अनेक दाम्पत्यांसाठी ही कहाणी खरंच प्रेरणादायी आहे. 

या आहेत काही खास टिप्स

यात काही युक्ती सामील आहेत. दिवसातून कमीत कमी एकदा तरी एकत्र जेवा. कधी तुम्हाला स्वत:ला बहिरे अथवा मुके असण्याचे नाटक करावे लागेल. तुम्हीही कितीही म्हातारे झाले असाल एकमेकांचा हात जरूर पकडा. सॉरी बोलणारी पहिली व्यक्ती बना. यात असे कॅप्शन देत त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य सांगितले आहे. 

सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव

या क्लिपमध्ये हिंदी गाणे 'इतनी सी हैसी, इतनी सी खुशी'   हे बर्फी सिनेमाती गाणी बॅकग्राऊंडला वाजत आहे. हे दोघेही वृद्ध दाम्पत्य आपले वैवाहिक जीवन आनंदात आणि मजेने जगत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत त्यांनी आपल्या रोजच्या जगण्यातील क्षण दाखवले आहेत. या व्हिडिओवर भरपूर कमेंट्स आल्या आहेत. यात काही सामान्य कमेंट्स आहेत तर काही खास. काहींनी म्हटले ते किती प्रेमळ आहे. . 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी