Ways to Make Your Partner Feel Loved: नवी दिल्ली : पती-पत्नीच्या नात्यात प्रेम टिकवणे आवश्यक आहे. त्यासाठी फक्त प्रेम व्यक्त करण जसं गरजेचे आहे, तसेच पत्नीच्या कामाचे कौतुकही केले पाहिजे. यामुळे नात्यातील गोडवा, प्रेम, आपुलकी कायम राहते.
लग्नाच्या काही वर्षानंतरच पती-पत्नी आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त होतात की ते एकमेकांची काळजी घेण्यासही कधीकधी विसरतात. आपल्या पार्टनरला गृहित धरायला लागतात. पत्नी नोकरी करणारी असो वा गृहिणी, तिला वेळोवेळी स्पेशल फिलींग देणं आवश्यक असते.जर पत्नीला वाटत असेल की आपला पती आता पूर्वीसारखा आपल्याशी वागत नााही, बोलत नाही तर त्याचा नात्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता हे व्यक्त करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकच त्यांच्या कामाचं कौतुकही नक्कीच करा.
जोडीदाराला महागडे गिफ्ट देऊनच प्रेम व्यक्त करणे आवश्यक नाही. प्रेमाने दिलेले एखादे छोटेसे गुलाबाचे फुलही नात्यातील ताजेपणा कायम ठेवू शकते. नात्याची वीण घट्ट होण्यास खूप मदत होते. महागड्या गिफ्ट्सपेक्षाही कधी कधी हे छोटसं गुलाबाचं फुल जादू करतं.
हा सगळ्यात महत्ताचा फॅक्टर आहे. बहुतेक बायकांची तक्रार असते की नवरा घरी येत नाही. आणि घरी आलाच वेळेवर तरी घरातही ऑफिसच्या कामातच व्यस्त असतो.
त्यामुळे घर आणि ऑफिस वेगवेगळं ठेवायला शिका. पत्नीला योग्य तितका वेळ द्या. त्यामुळे तुमच्याही मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. ऑफिसमधून आल्यानंतर बायकोसोबत थोडा वेळ घालवा. त्यांचा दिवस कसा गेला आणि त्यांनी काय केले ते त्यांना विचारा. यामुळे तुमचे नाते घट्ट होईल.
तुम्ही दोघेही काम करत असाल तर त्यांना मदत करणे आणि घरातील जबाबदाऱ्या अर्ध्या-अर्ध्या वाटून घेणे तुमचे कर्तव्य आहे. स्वयंपाकघरातील कामातही पत्नीला मदत करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने पत्नीलाही तुमचे प्रेम जाणवेल आणि नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल.
घरातील बहुतेक कामे बायका करतात, तरीही घरातील मंडळी त्यांचे आभार मानायला विसरतात. यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंडही निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपल्या पत्नीला वेळोवेळी थँक्यू म्हणा. एखादं thank you जे काम करेल की तुमचं नातं पु्न्हा एकदा टवटवीत होईल.
तुम्ही दिवसभरात अशा अनेक छोट्या-छोट्या चुका करता, ज्यासाठी तुम्ही माफीही मागत नाही. तुमचा पार्टनर सांगत नाही की तुम्ही ही चूक केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या पत्नीला एखाद्या वेळी सॉरी म्हटले तर तिच्या चेहऱ्यावर हसू तर येतेच पण नात्यातील प्रेमही अबाधित राहते. नात्यात आलेली मरगळ हा छोटासा सॉरी शब्द चुटकीसरशी दूर करू शकतो हे कायम लक्षात ठेवा.