नाते कायम मजबूत ठेवण्यासाठी वापरा 'या' 5 रिलेशनशिप टिप्स

नाती मजबूत ठेवण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल. एकमेकांच्या भावना समजून घेऊन आपल्या जोडीदारासोबत ठामपणे उभे राहायला हवे.

tips to maintain better relationship
नाते कायम मजबूत ठेवण्यासाठी वापरा 'या' 5 रिलेशनशिप टिप्स  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • आपल्या जोडीदारासाठी वेळ काढणे गरजेचे असते 
  • नाते मजबूत ठेवण्यासाठी आपल्या जोडीदारासोबत गोष्टी शेअर करा 
  • नाते सुदृढ ठेवण्यसाठी दुसऱ्याच्या भावना समजून घ्याव्यात

सुखी संसाराचे रहस्य: सुखी संसारासाठी पती-पत्नीच्या नात्याला प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा या गोष्टी महत्वाच्या असतात. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. कठिण प्रसंगी एकमेकांचा आधार बनावे लागते. परंतु, नात्याच्या सुरूवातीला त्या व्यक्तिसोबत वेळ घालवायला आवडते. त्या व्यक्तिबद्दल सर्वकाही जाणून घ्यावे असे आपल्याला वाटते. परंतु, जसा वेळ जातो तसे नात्यातील प्रेम व आत्मियता कमी होऊ शकते. अशा वेळी नात्यात रोमान्स व प्रेम कायम ठेवणे एक आव्हान असते. या नात्याला मजबूत कसे ठेवावे हे आपण जाणून घेऊ.

एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करा

जर तुम्हाला वाटत असेल की आपले जोडीदाराशी नाते मजबूत राहावे तर, त्याच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करणे गरजेचे आहे. मग ती गोष्ट कुटुंबातील असो वा मित्रांतली. तुम्ही कितीही नाराज असला तरी, तुमच्यातला संवाद बंद व्हायला नको. कारण, संवाद थांबला की लगेच गैरसमज निर्माण होतात. जोडीदारास आपल्या नाराजीचे कारण समजावून सांगावे. यामुळे नातं मजबूत होतं आणि ते दूरावत नाही.

एकमेकांच्या भावना समजून घ्या

धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा कामात व्यस्त होऊन जातो की जोडीदाराला वेळच देऊ शकत नाही. अशात कितीही व्यस्त असले तरी वेळ काढून जोडीदारासोबत घालवावा. नाते चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी जोडीदाराशी शारीरिक व भावनिक संबंध अतिशय महत्वाचे असतात. त्यामुळे, यावर मोकळ्या मनाने बोलून त्या समजून घेणे गरजेचे आहे.

जोडीदाराचे म्हणने ऐकूण घ्यावे

संवाद कुठल्याही नात्याचा महत्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे, आपल्या जोडीदाराचे म्हणणं ऐकायला हवे. त्या ऐकूण त्यावर योग्य प्रतिक्रिया द्या. अनेकवेळा आपले म्हणणं ऐकावे अशी आपलीही इच्छा असतेच. ती गोष्ट कितीही साधारण असली तरीही त्याकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही जोडीदाराकडे दुर्लक्ष करीत आहात असे त्यांना वाटू नये याची काळजी घ्यायला हवी.

विश्वास ठेवावा

विश्वास हा नात्याचा पाया असतो. नाते कायम अतूट ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा असतो. परंतु, नात्यात सतत संशय निर्माण होत असेल तर, त्यात दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे तो विश्वास कायम असला पाहिजे.

नात्यांना मजबूत कसे बनवावे

नाते टिकवण्यासाठी सतत आपल्या जोडीदाराला ते खास असल्याची जाणीव करून द्या. त्यांच्यासाठी नेहमी काहीतरी खास करावे. नियमितणे असे करणे तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवेल व सतत प्रेमाची जाणीव जिवंत राहील. घरातील छोट्या कामांमध्ये सहाय्यता करावी. त्यांना डिनरसाठी बाहेर घेऊन जावे. याने नात्यातले प्रेम वाढून ते मजबूत होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी