Preserve Garlic : वर्षभर खाऊ शकाल फ्रेश लसूण, उन्हाळ्यातही नाही सुकणार लसूण पाकळ्या

Tips To Preserve Garlic For A Year, Tips To Preserve Lehsun For A Year, Tips To Preserve Lasun For A Year : लसूण खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. पण खरेदी केलेला लसूण सुकून जातो अशी अनेकांची तक्रार असते. यावर प्रभावी उपाय आहे. हे उपाय करून दीर्घकाळ लसूण सुरक्षित ठेवणे शक्य आहे. 

Preserve Garlic
वर्षभर खाऊ शकाल फ्रेश लसूण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वर्षभर खाऊ शकाल फ्रेश लसूण, उन्हाळ्यातही नाही सुकणार लसूण पाकळ्या
  • हे उपाय करून दीर्घकाळ लसूण सुरक्षित ठेवणे शक्य
  • कच्चा लसूण चावून खाण्याचे फायदे

Tips To Preserve Garlic For A Year, Tips To Preserve Lehsun For A Year, Tips To Preserve Lasun For A Year : लसूण खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कच्चा लसूण चावून खाल्ल्याने गंभीर आजारांपासून संरक्षण होते. यामुळे लसूण खाणे आरोग्यासाठी लाभदायी आहे. पण खरेदी केलेला लसूण सुकून जातो अशी अनेकांची तक्रार असते. यावर प्रभावी उपाय आहे. हे उपाय करून दीर्घकाळ लसूण सुरक्षित ठेवणे शक्य आहे. 

हे उपाय करून दीर्घकाळ लसूण सुरक्षित ठेवणे शक्य

  1. अख्ख्या लसणातून एखादी लसूण पाकळी वेगळी काढली तर ती पाकळी हळू हळू खराब होते. तसेच सालं काढलेल्या अर्थात सोललेल्या लसणाची पाकळी पण हळू हळू खराब होते. दीर्घकाळ कच्चा लसूण सुरक्षित आणि ताजा राहावा असे वाटत असेल तर अख्ख्या लसणातून पाकळी तोडू नये तसेच लसणाची सालं काढू नये. लसूण सोलू नये.
  2. स्वच्छ आणि कोरड्या अशा ज्यूटच्या पिशवीत अथवा सुती कापडाच्या पिशवीत ठेवलेला अख्खा कच्चा लसूण दीर्घकाळ सुरक्षित राहतो. गरजेनुसार निवडक अख्ख्या लसणातून निवडक लसूण पाकळ्या लेगळ्या काढून त्या वापरता येतात.
  3. जेव्हा एखादा अख्खा लसूण तोडून त्याच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात तेव्हा तो लसूण हळू हळू खराब होतो. हे टाळण्यासाठी तोडलेला, पाकळ्या वेगळ्या केलेला लसूण 4 ते 7 दिवसांत वापरून संपवावा. उरलेले अख्खे लसूण स्वच्छ आणि कोरड्या अशा ज्यूटच्या पिशवीत अथवा सुती कापडाच्या पिशवीत ठेवावे.
  4. तोडलेला लसूण अथवा वेगळ्या केलेल्या, सोललेल्या लसूण पाकळ्या एखाद्या वाटीत अथवा डिशमध्ये वा भांड्यात वेगळ्या काढून त्या स्वच्छ आणि कोरड्या राहतील याची खबरदारी घ्यावी. हा लसूण 4 ते 7 दिवसांत वापरून संपवावा. संपेपर्यंत हा लसूण फ्रीजमध्ये ठेवणे फायद्याचे ठरू शकते. पण एक आठवड्यापेक्षा जास्त काळ तोडलेला, सोललेला लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये. तोडलेला, सोललेला लसूण हवाबंद डब्यात किंवा हवाबंद पिशवीत ठेवून 4 ते 7 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. या काळात हा लसूण वापरून संपवणे आवश्यक आहे. 

कच्चा लसूण चावून खाण्याचे फायदे

कच्चा लसूण चावून खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. दररोज कच्च्या लसणाच्या 3 ते 5 पाकळ्या चावून खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदय निरोगी राहते. मधुमेहाचा आणि कॅन्सरचा धोका कमी होतो. लसणातील अँटीऑक्सिडंटमुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांचा धोका कमी होतो. रोगप्रतिकारक  शक्ती वाढते. रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

Womens Day : महिलांनी करून घ्याव्या या आरोग्य तपासण्या

लांबसडक सुंदर केसांसाठी खा हे पदार्थ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी