Tips to reduce electricity bill : लाईटचं बिल होईल 3 हजार रुपयांनी कमी, करा हे सोपे उपाय

दरमहा येणारं अव्वाच्या सव्वा लाईट बिल कमी करायचं असेल, तर काही सोपे उपाय करता येतात. त्यामुळे दरमहा साधारणपणे 3 हजार रुपयांपर्यंत विजबिलाची बचत होऊ शकते.

Tips to reduce electricity bill
लाईटचं बिल करा 3 हजार रुपयांनी कमी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लाईट बिल कमी करण्यासाठी सोपे उपाय
  • एसी वाढवतो सर्वाधिक विजेचं बिल
  • इलेक्ट्रिक गिझरला शोधा पर्याय

Tips to reduce electricity bill | उन्हाळ्यात वीजेच्या बिलात वाढ होत असल्याचा अनुभव अनेकदा येतो. थंडी संपली आणि उन्हाची चाहूल लागायला की सुरुवात झाली की महिन्याभरातच लाईट बिलाचा आकडाही फुगायला सुरुवात होते. तापमानाचा आणि लाईट बिलाचा आकडा 

जणू एकसारखाच वाढत गेल्याचा अनुभव प्रत्येक उन्हाळ्यात सर्वसामान्यांना येत असतो. मात्र विजेचं बिल हे विजेच्या वापरावरच अवलंबून असल्यामुळे ते कमी करण्यासाठी विजेचा वापर कसा कमी करता येईल, याचा विचार कऱणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सोप्या गोष्टी करून आपण प्रत्येक महिन्याचं विजेचं बिल कमी करू शकतो. या उपायांनी दरमहा विजेच्या बिलात साधारण 3 हजार रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घेऊया अशा काही उपायांविषयी.

सर्वाधिक बिल एसीमुळे

विजेचं बिल कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या साधनांचा वापर कमी करण्याची गरज असते. उन्हाळ्यात सर्वाधिक बिल वाढवण्याचं काम करतात ते एसी. त्यामुळे तुमच्या घरी असणाऱ्या एसीची तब्येत तपासण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. अलिकडे इन्व्हर्टर एसी बाजारात आले आहेत. हे एसी लाईट बिल वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुमच्याकडे इन्व्हर्टर एसी नसेल, तर ताबडतोब तुम्ही तशा प्रकारचा एसी खरेदी करू शकता.

एसीचं करा सर्व्हिसिंग

अनेक लोक वर्षानुवर्षं एसीचं सर्व्हिसिंग करत नाहीत. त्यामुळे काही काळाने एसीची कूलिंग करण्याची क्षमता कमी होते आणि खोली थंडच होत नसल्याच अनुभव येतो. त्यामुळे अपेक्षित गारवा मिळवण्यासाठी अधिक वेळ एसी सुरु ठेवला जातो आणि त्यामुळे बिल वाढतं. एसीचं सर्व्हिसिंग वेळच्या वेळी केलं, तर कमीत कमी वेळेत अधिक गारवा देण्याचं काम एसी करू शकतो. शिवाय सर्व्हिसिंग केलेल्या एसीतून अधिकाधिक शुद्ध हवा आपल्याला मिळू शकते. 

अधिक वाचा - Relationship Tips: पत्नी नवऱ्यावर का संशय घेते, ही असतात 4 मोठी कारणे...

गिझऱचा वापर करा कमी

एसीच्या खालोखाल घरातील विजेचं बिल वाढवणारी दुसरी वस्तू म्हणजे गिझर. आता तुम्ही म्हणाल की उन्हाळ्यात असा कितीचा गिझरचा वापर होणार आहे? उन्हाळ्यात गिझरचा वापर होत नसला तरी थंडीच्या काळात त्याचा वापर वाढतो. एकीकडे एसीचा वापर काहीसा कमी होतो, मात्र तेवढ्यात प्रमाणात गिझरचा वापर वाढतो. त्यामुळे वीजेच्या बिलात फारसा फरक पडताना दिसत नाही. 

अधिक वाचा -  घराच्या भिंतीशी संबंधित 'या' 4 चुकांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होईल बराच फायदा

विजेऐवजी गॅसचा गिझर 

विजेचं बिल कमी करायचं असेल तर गॅसवर चालणारा गिझर वापरणं हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. गॅस गिझर हे लाईटवर चालणाऱ्या गिझरच्या तुलनेत स्वस्त पडतात आणि अधिक जलद पाणी गरम व्हायला त्यामुळे मदत होते. पैसे आणि वेळ या दोन्हीची बचत करायची असेल, तर गॅसवर चालणारे गिझर वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी