Tips for local saloon: तुम्हीही लोकल सलूनमध्ये केस कापता? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

प्रत्येकालाच महागड्या सलूनमध्ये जाणं परवडत नाही. त्यामुळे आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या सलूनमध्ये जाऊन ते केस कापत असतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत असते आणि आरामात केस कापण्याचा आनंदही घेता येतो. मात्र तुमची हेअरस्टाईल बिघडू नये आणि तुमचा लूक खराब होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज असते.

Tips for local saloon
तुम्हीही लोकल सलूनमध्ये केस कापता का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लोकल सलूनमध्ये जाताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज
  • तुमच्या मनातील हेअरकट हेअर ड्रेसरला नीट समजावून सांगा
  • केस कापताना डोळे मिटून न बसता प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवा

Tips for local saloon: आपली हेअर स्टाईल (Hair Style) ही आपल्या व्यक्तीमत्त्वाचा (Personality) एक महत्त्वाचा भाग असते. आपला लूक, आपलं दिसणं या गोष्टी हेअर स्टाईलवर अवलंबून असतात. त्यासाठी अनेकजण स्टायलिश आणि ब्रँडेड सलूनमध्ये जाऊन आपली केशरचना करत असतात. त्यासाठी शेकडो रुपये खर्च करण्याची त्यांची तयारी असते. मात्र या प्रकारासाठी बराचसा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. प्रत्येकालाच महागड्या सलूनमध्ये जाणं परवडत नाही. त्यामुळे आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या सलूनमध्ये जाऊन ते केस कापत असतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत असते आणि आरामात केस कापण्याचा आनंदही घेता येतो. मात्र तुमची हेअरस्टाईल बिघडू नये आणि तुमचा लूक खराब होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज असते. जाणून घेऊया, अशाच काही टिप्स.

गडबड करू नका

साध्या सलूनमध्ये चांगली हेअरस्टाईल हवी असेल, तर गर्दीच्या वेळी अशा ठिकाणी जाणे टाळायला हवे. सलूनमध्ये जेव्हा जास्त गर्दी असते, तेव्हा दुकानदार जास्त गडबडीत असतो. त्यामुळे कमीत कमी वेळेत काम संपवून अधिकाधिक ग्राहकांना सेवा देण्याकडे त्याचा नैसर्गिक कल असतो. त्यामुळे विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी सलूनमध्ये जाणं टाळायला हवं. रिकाम्या वेळेत जर तुम्ही सलूनमध्ये जाऊ शकला, तर तुम्हाला चांगली आणि एक्स्ट्रा सेवादेखील मिळण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Workplace challenge: करिअरमध्ये प्रगती करताना महिलांपुढं असतात ‘ही’ आव्हानं, वाचा सविस्तर

हेअर ड्रेसरला समजून सांगा

सलूनमध्ये असणाऱ्या हेअर ड्रेसरला कामाचा बराच अनुभव असल्यामुळे आपल्या हेअर स्टाईलचा निर्णय अनेकजण त्याच्यावरच सोपवताना दिसतात. मात्र त्यामुळे तुमची हेअरस्टाईल खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केस कापायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला नेमकी कशी हेअरस्टाईल हवी आहे, हे तुमच्या हेअर ड्रेसरला नीट समजावून सांगा. त्यामुळे त्याचंही काम सोपं होईल आणि तुम्हालाही तुमच्या मनासारखा हेअर कट मिळू शकेल. 

अधिक वाचा - Study Tips: पाठांतर करूनदेखील विस्मरण होते का? मग या 5 टिप्सने वाढवा स्मरणशक्ती

निष्काळजी राहू नका

काही लोक हेअर ड्रेसरला एकदा आपल्या हेअरकटविषयी सांगितल्यानंतर निष्काळजी होतात आणि बिनधास्तपणे डोळे मिटून बसून राहतात. त्यामुळे हेअर ड्रेसर करत असलेल्या चुका आपल्या लक्षातच येत नाहीत. यासाठी सतत जागरुक राहणे आणि काही चूक होत असल्याचं जाणवताच हेअर ड्रेसरला त्याची कल्पना देणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्यासमोर लावण्यात आलेल्या आरशाचा तुम्ही उपयोग करू शकता. आपलं लक्ष आहे, हे जाणवल्यानंतर हेअर ड्रेसरही सजग राहतो आणि चुका करणं टाळतो. मात्र तुम्ही जर डोळे मिटून झोपून राहिलात, तर मात्र तो निर्धास्त होतो आणि चुका होण्याची शक्यता अधिक असते. 

डिस्क्लेमर - लोकल हेअर सलूनमध्ये घ्यावयाच्या काळजीबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत आणि सामान्यज्ञानावर आधारित आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी