Mixer Blade : मिक्सरच्या पात्यांची धार कमी झालीय? नो टेन्शन! करा हे घरगुती उपाय

मिक्सरच्या पात्यांची धार काही वर्षांनी कमी होते. अशा वेळी काही सोप्या उपायांनी घरात तुम्ही मिक्सरची पाती धारदार करू शकता.

Mixer Blade
मिक्सरच्या पात्यांची धार कमी झालीय?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ब्लेडच्या पात्यांची धार हळूहळू होते कमी
  • घरगुती उपायांनी पाती होतात धारदार
  • काही मिनिटांत मिक्सर होतो पूर्ववत

Mixer Blade : एकेकाळी वेगवेगळे पदार्थ कुटण्यासाठी (Grind) उखळीचा वापर केला जात असे. त्यानंतर पदार्थ कुटण्याच्या साधनांमध्ये बदल होत गेले. आधुनिक काळात किचनमध्ये (Kitchen) मिक्सर ग्राइंडरचा (Mixer Grinder) वापर करून पदार्थ कुटले जातात. पदार्थ बारिक करण्यासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी मिक्सरचा वापर केला जातो. मिक्सरमध्ये कुटले जाणारे पदार्थ हे कधी मऊ असतात तर कधी कडक असतात. मिक्सरचा वापर सुरु ठेवल्यानंतर काही काळानंतर त्याच्या पात्यांची धार कमी होऊ लागल्याचं दिसून येतं. अशा वेळी काय करावं, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. काही घरगुती उपायांनी मिक्सरच्या पात्यांची (Mixer Blades) धार पुन्हा पूर्ववत करता येणं (Sharpen) शक्य आहे. जाणून घेऊया, अशाच काही उपायांनी. 

सँडपेपरने वाढते धार

सँडपेपरचा वापर करून तुम्ही तुमच्या मिक्सरची पाती धारदार करू शकतात. त्यासाठी मिक्सरमधील ब्लेड काढून वेगळे करा. त्यावर एक-दोन चमचे पाणी ओता आणि सॅडपेपरने पाती घासा. घासताना मध्ये मध्ये त्यावर पाणी टाकत राहा. त्यानंतर पुढच्या पाच ते दहा मिनिटांत तुमच्या मिक्सरची पाती धारदार झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. 

लोखंडी रॉडचा करा वापर

लोखंडी रॉडचा वापर करूनही तुम्ही मिक्सरची पाती धारदार करू शकता. त्यासाठी अगोदर लोखंडाचा रॉड स्वच्छ धुवून घ्या आणि काही वेळ उन्हात वाळवत ठेवा. उन्हात रॉड गरम झाल्यानंतर एका कापडाने तो पकडा आणि हळूहळू मिक्सरच्या पात्यांवर घासा. पुढच्या काही मिनिटांतच मिक्सच्या पात्याची धार त्यामुळे शार्प होऊ लागेल. गरम रॉड मिक्सरच्या पात्यांवर घासताना काही वेळा थोड्याफार ठिणग्या उडण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे हे काम करताना सावध राहा आणि सर्व खबरदारीचे उपाय करूनच पात्याला धार लावायला सुरुवात करा. 

अधिक वाचा - India At 75 : दूध न आवडणार्‍या व्यक्तीने देशात आणला दुधाचा महापूर, ही आहे वर्गीज कुरियन यांची कहाणी

सिरॅमिक टाइल्सनेही निघते धार

मिक्सरच्या पात्यांची धार कमी झाली असेल तर सिरॅमिक टाईल्सचा वापर करूनही मिक्सरच्या परफॉर्मन्स तुम्ही सुधारू शकता. त्यासाठी अगोदर मिक्सरची पाती बाहेर काढा. त्यावर पाणी ओतून ती ओली करून घ्या. मग हळूहळू सिरॅमिक टाईल्सने पाती घासायला सुरुवात करा. थोड्या थोड्या वेळाने त्यावर पाणी ओतत राहा.  सिरॅमिक टाईलने पाती घासताना त्यावर चिखलाप्रमाणे पाणी साठत राहिल. थोड्या थोड्या वेळाने पाणी ओतून पाती साफ करत राहा आणि तुमच्या मनाप्रमाणे पात्यांना धार निघेपर्यंत घासत राहा. 

अधिक वाचा - हाऊ रोमँटिक !, २० वर्षांनंतर फुलली चाळीशीतल्या महिलेची अनोखी लवस्टोरी

घरगुती उपायांचा फायदा

अनेकदा मिक्सरच्या पात्यांची धार कमी झाल्याचं आपल्याला माहित असतं. मात्र आपल्या परिसरात पात्यांना धार लावून कुठे मिळेल, याची सर्वसामान्यांना कल्पना नसते. त्यामुळे हे काम अनेक महिने रखडलेलं असतं आणि त्याचा स्वयंपाकावरही परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत काही सोप्या आणि घरगुती उपायांनी मिक्सरची पाती पुन्हा धारदार करणं शक्य आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी