Vastu tips: या गोष्टी पर्समध्ये ठेवणे मानले जाते अशुभ, भासू शकते पैशाची मोठी कमतरता

Vastu tips:वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी पर्समध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं. चावी, पैसे, बिलाची पावती, विडी-सिगारेट, नाणी इत्यादी गोष्टी पर्समध्ये ठेवल्यास पैशाची कमतरता भासू शकते.

To keep these things in a purse, can lead to shortage of money
या गोष्टी पर्समध्ये ठेवू नका, भासेल पैशाची कमतरता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तूशास्त्रानुसार काम केल्यास त्याचं शुभ फळ मिळेल
  • या गोष्टी पर्समध्ये ठेवू नका, पैशाची कमतरता भासेल
  • चावी, पैसे, बिलाची पावती, विडी-सिगारेट पर्समध्ये ठेवणं अशुभ

Vastu tips : प्रत्येक धर्मात जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत.. ज्यामध्ये वास्तुशास्त्राचाही समावेश आहे. वास्तूनुसार काम करणे शुभ मानले जाते. वास्तूनुसार काम न केल्यास त्याचे अशुभ फळ मिळते. आज आम्ही तुम्हाला पर्सशी संबंधित असे काही उपाय सांगणार आहोत जे वास्तुच्या नियमांनुसार आहेत. आपण सर्वजण नकळतपणे आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटात अशा वस्तू ठेवत असतो, ज्याचा ना काही उपयोग होतो ना आपल्याला त्याची कधी गरज भासते. तरीही या गोष्टी नेहमी आपल्या पर्समध्ये पडून असतात. अशा गोष्टी अशुभ मानल्या जातात. (To keep these things in a purse, which can lead to a huge shortage of money)


वास्तु टिप्सनुसार, पर्समध्ये कधीही चावी ठेवू नका. पर्समध्ये चावी ठेवल्यास आर्थिक नुकसान होते असे सांगितले जाते. अनेकदा लोक पैसे पर्समध्ये दडवून ठेवतात. पण वास्तूनुसार असे करणे अयोग्य मानले जाते. याशिवाय कोणत्याही बिलाची पावती किंवा तिकीट कधीही वॉलेटमध्ये ठेवू नका. 
असे केल्याने घरात आर्थिक वाद वाढतात असे मानले जाते.

विडी-सिगारेट आणि गुटखा पाकिटात ठेवू नये. वास्तूनुसार रात्री झोपताना डोक्याजवळ पर्स ठेवू नका. पर्स तुमच्या कपाटात ठेवा. असे सांगितले जाते की पर्स कापली किंवा फाटली तर ताबडतोब बदलावी. जर कर्ज आणि व्याज भरावे लागणार असेल तर ती रक्कम पर्समध्ये ठेवू नये. अन्यथा, कर्ज आणि तोटा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, नोटा आणि नाणी आपल्या पाकिटात कधीही मिसळू नयेत. नाणीसुद्धा पाकिटात बंद ठिकाणी ठेवा.
 या गोष्टी पर्समध्ये ठेवा

वास्तूनुसार, तुम्ही तुमच्या पर्समध्ये देवी लक्ष्मीचे चित्र अवश्य ठेवावे. असे केल्याने तुमच्या पर्समध्ये नेहमी पैसे येतील असे मानले जाते. असे म्हणतात की या फोटोमुळे तुमचं पाकिट कधीही रिकामं राहणार नाही. पाकिटात चिमूटभर तांदूळ ठेवावा. असे केल्याने तुमचे पैसे लवकर खर्च होणार नाहीत असे सांगितले जाते. जर तुम्हाला पर्समध्ये तुमचे पैसे टिकवायचे असतील, तर पाकिटात खाद्यपदार्थ ठेवू नये. पर्समध्ये धार्मिक आणि पवित्र वस्तूंना स्थान द्या. ज्यामुळे तुमच्यावर सदैव लक्ष्मीत कृपा असेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी