Dr. Ambedkar Jayanti : आज 14 एप्रिल म्हणजे आपल्या भीमाचा जन्मदिन; बाबासाहेबांची 11 गीत, हे ऐकून तुमची छाती फुगेल 56 इंच

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 13, 2022 | 17:55 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी आहे. डॉ.आंबेडकरांचा जन्मदिवस हा केवळ जन्मदिवस नसून एक उत्सव आहे. भीम अनुयायी दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Dr. Ambedkar Jayanti  11 songs
डॉ. बाबासाहेबांची 11 गीत, ऐकून अंगावर येतील शहारे   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भीम अनुयायी दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात साजरी केली होती.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी आहे. डॉ.आंबेडकरांचा जन्मदिवस हा केवळ जन्मदिवस नसून एक उत्सव आहे. भीम अनुयायी दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. अनेक अनुयायी विविध मार्गाने आपल्या भीमाला मानवंदना देत असतात. डॉ. बाबासाहेबांचे कार्य सांगणारे अनेक गाणे आपण ऐकली असाल एव्हना म्हणत असाल. बाबासाहेबांवर अनेकांनी गाणी म्हटली असून आपण आज आपण त्यापैकी काही 11 गाण्याविषयी जाणून घेणार आहोत. जे ऐकून आपली छाती 56 इंच फुगल्याशिवाय राहणार नाही.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी 14 एप्रिल 1928 रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक असलेल्या बाबासाहेबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. 
बाबासाहेबांच्या कार्याविषयी सांगणारे 11 गाणी जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. 

 1) भिमा तु इतक दिल आम्हा 

हे गाणं गायक आनंद शिंदे यांनी गायलं असून याला संगीत निलेश गरुड यांनी दिेले आहे. 

2)   निळ्या निशाणा खाली

हे गाणे गायक आनंद शिंदे यांन गायले आहे. तर प्रल्हाद शिंदे यांनी संगीत दिले आहे. युट्यूबवर या गाण्याला 468,921 इतके व्ह्यूज आहेत. 

3) मया भिमानं सोन्यानं भरली ओटी

हे गाणं कडूबाई खरात (आई) यांनी  गायलं आहे. या गाण्याला 5,407,874 व्ह्यूज आहेत.  

4) भिम गरजला दिल्लीच्या दरबारी

https://youtu.be/F_1KQrFKxKg 

5) तुम्ही खाता त्या भाकरी वर बाबासाहेबांची सही हाय रं

 हे गाण  कडूबाई खरात (आई) यांनी  गायलं आहे. 

6) लाल दिव्याचा गाडीला  

हे गाणेही गायक आनंद शिंदे यांनी गायले आहे. तर संगीत हर्षद शिंदे यांनी दिले आहे. युट्यूबवर या गाण्याला 25,658,063 व्ह्यूज आहेत. 

7) साऱ्यात एक नंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर  

हे गाणं गायक रोहन गुजर यांनी गायले आहे. युट्यूबवर या गाण्याला 
626,878 इतके व्ह्यूज आहेत. 

8) किती शोभला असता भीम नोटावर

हे गाणे मिलिंद शिंदे यांनी गायले आहे, तर हर्षद शिंदे यांनी संगीत दिले आहे. या गाण्याला  13,926,619 व्ह्यूज आहेत.  

9) भीमराव एक नंबर 


गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे  

10) भीमराज की बेटी


गायिका  शकुंतला जाधव

11 ) सोनियाची उगवली पहाट 


गायक आनंद शिंदे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी