Today in History: Thursday, 14th July 2022: आज आहे आगरकर जयंती, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविषेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज गुरूवार १४ जुलै २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History: Thursday, 14th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

१४ जुलै - दिनविशेष

 1. १४ जुलै घटना - दिनविशेष
 2. २०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
 3. २००३: सन्दीप चंदा - जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
 4. १९७६: कॅनडा - देशात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
 5. १९५८: इराक - देशामध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
 6. १८६७: आल्फ्रेड नोबेल - यांनी डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
 7. १७८९: फ्रेंच क्रांती - पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची सुरवात होती.

१४ जुलै जन्म - दिनविशेष

 1. १९६७: हशन तिलकरत्ने - श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी
 2. १९२०: शंकरराव चव्हाण - महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री (निधन: २६ फेब्रुवारी २००४)
 3. १९१७: रोशन - संगीतकार (निधन: १६ नोव्हेंबर १९६७)
 4. १९१०: विल्यम हॅना - टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार
 5. १८९३: गारिमेला सत्यनारायण - भारतीय कवी आणि लेखक (निधन: १८ डिसेंबर १९५२)
 6. १८८४: यशवंत खुशाल देशपांडे - महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक (निधन: २० नोव्हेंबर १९७०)
 7. १८६२: गुस्टाफ क्लिम्ट - ऑस्ट्रियन चित्रकार
 8. १८५६: गोपाल गणेश आगरकर - थोर समाजसुधारक (निधन: १७ जून १८९५) 

१४ जुलै निधन - दिनविशेष

 1. २००८: यशवंत विष्णू चंद्रचूड - १६वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)
 2. २००३: रज्जू भैय्या - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)
 3. २००३: लीला चिटणीस - हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
 4. १९९८: रिचर्ड मॅकडोनाल्ड - मॅकडोनाल्डचे सह-संस्थापक (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)
 5. १९९३: श्रीमंत विजयमाला राणीसाहेब - करवीर संस्थानच्या महाराणी
 6. १९७५: मदन मोहन - भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: २५ जून १९२४)
 7. १९६३: स्वामी शिवानंद सरस्वती - योगी व आध्यात्मिक गुरू (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)
 8. १९३६: धन गोपाळ मुखर्जी - भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान (जन्म: ६ जुलै १८९०)
 9. १९०४: पॉल क्रुगर - दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी