Today in History: Wednesday. 13th July 2022: दिनविशेष: बुधवार, १३ जुलै २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history 13th july 2022
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज बुधवार, १३ जुलै २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History: Wednsday, 13th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

१३ जुलै घटना - दिनविशेष

 1. २०११: मुंबई बॉम्बस्फोट - मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत किमान २६ लोकांचे निधन तर किमान १३० जण जखमी.
 2. १९८३: श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.
 3. १९७७: रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.
 4. १९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
 5. १९२९: जतिंद्रनाथ दास - यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचे निधन झाले.
 6. १९०८: ऑलिम्पिक स्पर्धा - स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
 7. १८३७: बकिंगहॅम पॅलेस, इंग्लंड - राणी व्हिक्टोरिया यांनी या पॅलेसमध्ये अधिकृतपणे राहण्यास सुरवात केली, तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजा-राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

१३ जुलै जन्म - दिनविशेष

 1. १९६४: उत्पल चॅटर्जी - भारतीय क्रिकेट खेळाडू
 2. १९५३: लॅरी गोम्स - वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू
 3. १९४४: एर्नो रुबिक - रुबिक क्यूबचे निर्माते
 4. १९४२: हॅरिसन फोर्ड - अमेरिकन अभिनेते
 5. १८९२: केसरबाई केरकर - भारतीय शास्त्रीय गायिका - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १६ सप्टेंबर १९७७)

१३ जुलै निधन - दिनविशेष

 1. २०१०: मनोहारी सिंग - प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१)
 2. २००९: निळू फुले - हिंदी मराठी चित्रपट अभिनेते (जन्म: ४ एप्रिल १९३०)
 3. २०००: इंदिरा संत - कवयित्री व लेखिका - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ४ जानेवारी १९१४)
 4. १९९४: पं. के. जी. गिंडे - धृपद गायक, संगीतकार शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५)
 5. १९९०: बॉबी तल्यारखान - क्रीडा समीक्षक व समालोचक
 6. १९८०: सेरेत्से खामा - बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
 7. १९६९: धोंडीराजशास्त्री विनोद - स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक (जन्म: १२ जानेवारी १९०२)
 8. १७९३: ज्याँपॉल मरात - फ्रेंच क्रांतिकारी
 9. १६६०: बाजीप्रभू देशपांडे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी