Today in History Monday, 15th August 2022 : आज आहे भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन तसेच योगी आरोबिंदो यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन
 • आज आहे लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म दिन
 • आज आहे लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म दिन

Today in History: Monday, 15th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  

अधिक वाचा : India At 75 : दूध न आवडणार्‍या व्यक्तीने देशात आणला दुधाचा महापूर, ही आहे वर्गीज कुरियन यांची कहाणी

१५ ऑगस्ट - दिनविशेष

 1. १९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.
 2. १९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
 3. १९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
 4. १९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
 5. १९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
 6. १९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
 7. १९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
 8. १९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.
 9. १८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
 10. १८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
 11. १६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसऱ्यांदा) पराभूत केले.

अधिक वाचा : Hotel Booking Tips : हॉटेल बुक करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, कमी पैशात मिळतील जास्त सुविधा

१५ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९९२: भास्करन आडहान - भारतीय बुद्धिबळपटू
 2. १९७५: विजय भारद्वाज - भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक
 3. १९७१: अदनान सामी - भारतीय गायक आणि संगीतकार - पद्मश्री
 4. १९७०: राज कौशल - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: ३० जून २०२१)
 5. १९६४: मेलिंडा गेट्स - बिल & मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सह-संस्थापिका
 6. १९६१: सुहासिनी मणिरत्नम - भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक
 7. १९५८: सिंपल कपाडिया - अभिनेत्री आणि वेशभूषाकार (निधन: १० नोव्हेंबर २००९)
 8. १९४९: सिद्धरामय्या - कर्नाटकचे २२वे मुख्यमंत्री
 9. १९४७: राखी गुलझार - चित्रपट अभिनेत्री
 10. १९४५: बेगम खालेदा झिया - बांगला देशच्या पंतप्रधान
 11. १९२९: उमाकांत ठोमरे - साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक (निधन: ७ ऑक्टोबर १९९९)
 12. १९२६: सुकांता भट्टाचार्य - भारतीय कवी आणि नाटककार (निधन: १३ मे १९७४)
 13. १९२२: वामनदादा कर्डक - लोककवी
 14. १९२२: कुशाभाऊ ठाकरे - वकील आणि राजकारणी (निधन: २८ डिसेंबर २००३)
 15. १९१७: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी - ज्येष्ठ लेखिका (निधन: १३ नोव्हेंबर २००१)
 16. १९१५: इस्मत चुगताई - ऊर्दू लेखिका (निधन: २४ ऑक्टोबर १९९१)
 17. १९१३: बी. रघुनाथ - लेखक, कवी (निधन: ७ सप्टेंबर १९५३)
 18. १९१३: भगवान रघुनाथ कुळकर्णी - मराठी कवी आणि लेखक (निधन: ७ सप्टेंबर १९५३)
 19. १९१२: उस्ताद अमीर खान - इंदौर घराण्याचे संस्थापक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १३ फेब्रुवारी १९७४)
 20. १९०४: जॉर्ज क्लाईन - मोटार व्हीलचेअरचे शोधक (निधन: ४ नोव्हेंबर १९२२)
 21. १८७३: रामप्रसाद चंदा - भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार (निधन: २८ मार्च १९४२)
 22. १८७२: श्री अरबिंदो - क्रांतिकारक, धर्मगुरु (निधन: ५ डिसेंबर १९५०)
 23. १८६७: गणपतराव जोशी - रंगभूमी अभिनेते (निधन: ७ मार्च १९२२)
 24. १८६५: मिकाओ उसुई - रेकीचे निर्माते (निधन: ९ मार्च १९२६)
 25. १७९८: संगोली रायन्ना - भारतीय योद्धा (निधन: २६ जानेवारी १८३१)
 26. १७६९: नेपोलिअन बोनापार्ट - फ्रान्सचा सम्राट (निधन: ५ मे १८२१) 

अधिक वाचा : Knotting Tie Well : टाय बांधताना चुकूनही ‘हे’ करू नका, चांगला लूकही होईल खराब

१५ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २००५: बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण - भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: ३० जानेवारी १९२७)
 2. २००४: अमरसिंग चौधरी - गुजरातचे ८वे मुख्यमंत्री (जन्म: ३१ जुलै १९४१)
 3. १९७५: शेख मुजीबुर रहमान - बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १७ मार्च १९२०)
 4. १९७४: स्वामी स्वरुपानंद - (जन्म: १५ डिसेंबर १९०३)
 5. १९४२: महादेव देसाई - स्वातंत्र्य लढ्यातील नेते (जन्म: १ जानेवारी १८९२)
 6. १९३५: विल रॉजर्स - अमेरिकन अभिनेते
 7. १९३५: विली पोस्ट - अमेरिकन वैमानिक आणि जगाची परिक्रमा एकट्याने उड्डाण करणारे पहिले वैमानिक. (जन्म: २२ नोव्हेंबर १८९८)
 8. १११८: ऍलेक्सियस (पहिला) - कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट
 9. १०५७: मॅक बेथ - स्कॉटलंडचा राजा

अधिक वाचा : Self Dependant Child : ‘या’ वयानंतर मुलांना शिकवा 5 कामं, अनेक प्रश्न सुटतील चुटकीसरशी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी