Today in History, friday, 13th january 2023 : आज झाला होता मिकी माऊसच्या चित्रकथेचा जन्म, तर अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म दिवस 

Today in History : दिनांक १३ जानेवारी रोजी काय घटना घडल्या होत्या आणि कोणत्या महान व्यक्तींचा जन्म झाला होता. तसेच कोणत्या महान व्यक्तीने या दिवशी जगाचा निरोप घेतला होता. याची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. 

today is Astronaut Rakesh Sharma's Birthday know today in history 13th Januvery  2023
जाणून घ्या आजचा इतिहास, 13 जानेवारी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दिनांक १३ जानेवारी रोजी काय घटना घडल्या होत्या
  • कोणत्या महान व्यक्तींचा जन्म झाला होता.
  • तसेच कोणत्या महान व्यक्तीने या दिवशी जगाचा निरोप घेतला होता.

Today in History :  दिनांक १३ जानेवारी रोजी काय घटना घडल्या होत्या आणि कोणत्या महान व्यक्तींचा जन्म झाला होता. तसेच कोणत्या महान व्यक्तीने या दिवशी जगाचा निरोप घेतला होता. याची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.  (today is Astronaut Rakesh Sharma's Birthday know today in history 13th Januvery  2023)

१३ जानेवारी दिनविशेष


ठळक घटना / घडामोडी
१५५९: एलिझाबेथ यांची पहिल्या इंग्लंडच्या राणीपदी नियुक्ती करण्यात आली.
१६१०:  प्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह असलेल्या कॅलिस्टोचा शोध लावला.
१८४२: काबुलमधून माघार घेणार्‍या ब्रिटीश-भारतीय सैन्याच्या १६,५०० सैनिक आणि असैनिकांपैकी असिस्टंट सर्जन विल्यम ब्रायडन हा एकमेव जिवंत व्यक्ती जलालाबादला पोचला.
१८४९: इंग्रज आणि शीखांची दुसरी लढाई, चिलीयनवाला इथे सुरू झाली. ( या लढाईत शीखांचा विजय झाला होता. 
१८९९: गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला होता.
१९३०: मिकी माउस हा प्रथम चित्र रुपात आणि कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 
१९४२: अमेरिकेने जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना कारगृहात पाठविण्यास सुरूवात केली.
१९५७:  ओरिसातील प्रसिद्ध हिराकूड धरणाचे उद्घाटन झाले. या धरणाचे बांधकाम 1948 ला सुरू झाले होते. 
१९६४: कोलकाता येथे झालेल्या भीषण मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार झाले होते. 
१९६७: पुण्यातील एसपी सस्तावरील  स. प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव  चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
१९९६: मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली.
२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
२०११: भारतातील शेवटची पोलिओ रुग्ण सापडला.


जन्म / वाढदिवस

८८८: जाड्या चार्ल्स, पवित्र रोमन सम्राट.
१५९६: यान फान गोयॉ, डच चित्रकार.
१८९६: मनोरमा रानडे, रविकिरण मंडळातल्या कवयित्री.
१९१९: एम. चेन्‍ना रेड्डी, आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६).
१९२६: शक्ती सामंत, हिन्दी आणि बंगाली चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते.
१९३८: पं. शिवकुमार शर्मा, संतूरवादक आणि संगीतकार
१९४८: गज सिंघ, जोधपूरचा राजा.
१९४९: राकेश शर्मा, एकूण १३८ वा आणि पहिला भारतीय अंतराळवीर.
१९८३: इम्रान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.


मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

१८३२: थॉमस लॉर्ड, लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचे संस्थापक.
१९२६: मनोरमा रानडे, कवयित्री.
१९७६: अहमद जाँ थिरकवा, तबला वादक.
१९८५: मदन पुरी, हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेता.
१९९७: शंभू सेन, भारतीय संगीत आणि नृत्य दिग्दर्शक.
१९९७: मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे, उद्योजक आणि वेदाभ्यासक.
२००१: श्रीधर गणेश दाढे, संस्कृतपंडित आणि लेखक.
२०११: प्रभाकर पणशीकर, मराठी अभिनेता.
२०१३: रुसी सुरती, भारतीय क्रिकेट खेळाडू.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी