Today in History, Saturday, 29th October 2022 : आज पद्मश्री विजेंदर सिंग आणि माजी खासदार माणिकराव गावित यांचा जन्मदिन, वाचा आजचे दिनविशेष

Today in History, Saturday, 29th October 2022 :आज माजी खासदार माणिकराव गावित आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्मदिन. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची पुण्यतिथी. जाणून घ्या आजचे दिनविशेष.

Vijender Singh
विजेंदर सिंग   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज माजी खासदार माणिकराव गावित आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्मदिन.
 • गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची पुण्यतिथी.
 • जाणून घ्या आजचे दिनविशेष.

Today in History, Saturday, 29th October 2022 :  आज माजी खासदार माणिकराव गावित आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्मदिन. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची पुण्यतिथी. जाणून घ्या आजचे दिनविशेष. (today is boxer vijender singh and ex mp manikrao gavit birthday know today in history 29th october 2022)

अधिक वाचा :Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिला कधी असतात इच्छूक? या संकेतांनी ओळखा महिलेची इच्छा

२९ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

 1. १९८५: विजेंदर सिंग - भारतीय बॉक्सर - पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
 2. १९८५: कॅल क्रचलो - इंग्लिश मोटरसायकल रेसर
 3. १९७१: मॅथ्यू हेडन - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
 4. १९३४: माणिकराव गावित - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: १७ सप्टेंबर २०२२)
 5. १९३१: प्रभाकर तामणे - साहित्यिक व पटकथालेखक (निधन: ७ मार्च २०००)
 6. १९३१: वाली - भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते (निधन: १८ जुलै २०१३)
 7. १८९७: जोसेफ गोबेल्स - जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते (निधन: १ मे १९४५)
 8. १८८९: ली डझाओ - चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक (निधन: २८ एप्रिल १९२७)

अधिक वाचा : Women safety tips: नव्या शहरात शिफ्ट होताय? अगोदर वाचा या सेफ्टी टिप्स

९ ऑक्टोबर घटना - दिनविशेष

 1. २०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
 2. २००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
 3. २००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
 4. १९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
 5. १९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
 6. १९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
 7. १९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक् कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
 8. १९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
 9. १९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
 10. १९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
 11. १९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
 12. १९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
 13. १८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.

अधिक वाचा :  Tips for staying in hotel: हॉटेलमध्ये एकटं राहायची वाटते भिती? महिलांच्या सुरक्षेसाठी सोप्या टिप्स

२९ ऑक्टोबर निधन - दिनविशेष

 1. २०२०: केशुभाई पटेल - गुजरातचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: २४ जुलै १९२८)
 2. १९८८: कमलादेवी चट्टोपाध्याय - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या - रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ३ एप्रिल १९०३)
 3. १९८१: दादा साळवी - अभिनेते
 4. १९७८: वसंत रामजी खानोलकर - भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: १३ एप्रिल १८९५)
 5. १९५७: लुईस बी. मेयर - एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक (जन्म: ४ जुलै १८८२)
 6. १९३३: पॉल पेनलीव्ह - फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १८६३)
 7. १९११: जोसेफ पुलित्झर - हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक (जन्म: १० एप्रिल १८४७)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी