Today in History, Sunday, 2nd October 2022 : आज आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती, वाचा आजचे दिनविशेष

आज आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती, तसेच देशाचे माजी अर्थमंत्री सी.डी देशमुख यांची पुण्यतिथी. आज संगीतकार कौशल इनामदार यांचा जन्मदिन तसेच सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची पुण्यतिथी. जाणून घ्या आजचे दिनविशेष

mahatma gandhi jayanti 2022
महात्मा गांधी जयंती 2022  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती.
 • देशाचे माजी अर्थमंत्री सी.डी देशमुख यांची पुण्यतिथी.
 • सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची पुण्यतिथी.

Today in History, Sunday, 2nd October 2022 : मुंबई :  आज आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती, तसेच देशाचे माजी अर्थमंत्री सी.डी देशमुख यांची पुण्यतिथी. आज संगीतकार कौशल इनामदार यांचा जन्मदिन तसेच सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची पुण्यतिथी. जाणून घ्या आजचे दिनविशेष. (today is mahatma gandhi and lal bahadur shastri birth anniversary know today in history 2nd october 2022)

अधिक वाचा :  'या' 3 अक्षरांपैकी एका अक्षराने तुमच्या नावाची होते सुरुवात? मग तुम्ही आहात भाग्यवान, आयुष्यात होईल भरभराट


२ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

 1. १९७१: कौशल इनामदार - संगीतकार वव गायक
 2. १९६८: याना नोव्होत् ना - झेक लॉन टेनिस खेळाडू
 3. १९४८: पर्सिस खंबाटा - अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (निधन: १८ ऑगस्ट १९९८)
 4. १९४२: आशा पारेख - चित्रपट अभिनेत्री
 5. १९३९: बुद्धी कुंदर - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २३ जून २००६)
 6. १९३४: रजत कुमार कार - भारतीय नाटककार, लेखक आणि प्रसारक - पद्मश्री (निधन: ८ मे २०२२)
 7. १९२७: पं. दिनकर कैकिणी - शास्त्रीय गायक (निधन: २३ जानेवारी २०१०)
 8. १९०८: गंगाधर सरदार - विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार (निधन: १ डिसेंबर १९८८)
 9. १९०४: लालबहादूर शास्त्री - भारताचे २रे पंतप्रधान - भारतरत्न (निधन: ११ जानेवारी १९६६)
 10. १८९१: विनायक पांडुरंग करमरकर - भारतीय शिल्पकार - पद्मश्री (निधन: १३ जून १९६७)
 11. १८६९: मोहनदास करमचंद गांधी - भारतीय राष्ट्रपिता, महात्मा (निधन: ३० जानेवारी १९४८)
 12. १८४७: पॉल फॉन हिन्डेनबर्ग - जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (निधन: २ ऑगस्ट १९३४)
 13. ०९७१: महमूद - गझनीचा (निधन: ३० एप्रिल १०३०)

अधिक वाचा :  Mahatma Gandhi Jayanti : गांधी जयंतीनिमित्त करायचे भाषण


२ ऑक्टोबर घटना - दिनविशेष

 1. २००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
 2. १९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
 3. १९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच् च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.
 4. १९५८: गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
 5. १९५५: पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
 6. १९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
 7. १९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

अधिक वाचा : Parenting Tips: तुमच्या मुलांसमोर ‘या’ सात गोष्टी कधीच करू नका, लवकर बिघडेल मूल


२ ऑक्टोबर निधन - दिनविशेष

 1. १९८८: ऍलेक इझिगोनिस - मिनी कारचे निर्माते (जन्म: १८ नोव्हेंबर १९०६)
 2. १९८५: रॉक हडसन - अमेरिकन अभिनेते (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)
 3. १९८२: चिंतामणराव देशमुख - भारताचे अर्थमंत्री (जन्म: १४ जानेवारी १८९६)
 4. १९७५: के. कामराज - तामिळ नाडूचे २रे मुख्यमंत्री व स्वातंत्र्यसेनानी - भारतरत्न (जन्म: १५ जुलै १९०३)
 5. १९७४: सुधीमय प्रामाणिक - भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी (जन्म: ११ सप्टेंबर १८८४)
 6. १९२७: स्वाते अऱ्याहेनिअस - स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)
 7. १९०६: राजा रविवर्मा - चित्रकार (जन्म: २९ एप्रिल १८४८)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी