Today in History Tuesday, 23rdAugust 2022: आज आहे कवी विंदा करंदीकर यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित विंदा करंदीकर यांचा जन्मदिन.
  • आजच लिबियाचा हुकुमशहा गद्दाफीची सत्ता संपुष्टात आली होती.
  • आज आहे मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांची पुण्यतिथी.

Today in History: Tuesday, 23rd  August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  

अधिक वाचा :  Relationship Tips: दादल्यांनो हे माहिती आहे का? बायको नेहमी-नेहमी का करते कट-कट


२३ ऑगस्ट घटना - दिनविशेष

  1. २०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.
  2. २०११: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
  3. २००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
  4. १९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
  5. १९९१: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
  6. १९९०: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
  7. १९६६: लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
  8. १९४२: दुसरे महायुद्ध - स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
  9. १९१४: पहिले महायुद्ध - जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

अधिक वाचा :  10 Beautiful Places: आयुष्यात एकदा तरी 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या, जिवंतपणी अनुभवता येईल स्वर्गसुख

२३ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  1. १९७३: मलायका अरोरा खान - मॉडेल आणि अभिनेत्री
  2. १९६८: कृष्णकुमार कुन्नाथ (केके) - सुप्रसिद्ध भारतीय गायक (निधन: ३१ मे २०२२)
  3. १९५१: नूर - जॉर्डनची राणी
  4. १९४४: सायरा बानू - चित्रपट अभिनेत्री
  5. १९१८: विंदा करंदीकर - श्रेष्ठ कवी - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १४ मार्च २०१०)
  6. १८९०: हॅरी फ्रँक गग्नेहॅम - न्यूज-डेचे सहसंस्थापक (निधन: २२ जानेवारी १९७१)
  7. १८७२: तांगुतरी प्रकाशम - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २० मे १९५७)
  8. १८५२: राधा गोबिंद कार - भारतीय वैद्य आणि दानकर्ते (निधन: १९ डिसेंबर १९१८)
  9. १७५४: लुई (सोळावा) - फ्रान्सचा राजा (निधन: २१ जानेवारी १७९३)

अधिक वाचा :  Happy Life: या बदलांमुळे आयुष्य होईल आनंदी, सुखी जीवनाचे 8 सोपे मंत्र

२३ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  1. ६३४: अबू बक्र - रशीदुन खलीफाचे पहिले खलिफा (जन्म: २७ ऑक्टोबर ५७३)
  2. २०१३: रिचर्ड जे. कॉर्मन - आर. जे. कॉर्मन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक (जन्म: २२ जुलै १९५५)
  3. १९९७: एरिक गेयरी - ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान (जन्म: १८ फेब्रुवारी १९२२)
  4. १९९४: आरती साहा - इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)
  5. १९७५: पं. विनायकराव पटवर्धन - शास्त्रीय गायक (जन्म: २२ जुलै १८९८)
  6. १९७४: डॉ. शंकर दामोदर पेंडसे - मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)
  7. १९७१: रतन साळगावकर - मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४)
  8. १९७१: हंसा वाडकर - मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४)
  9. १८९२: डियोडोरो डा फोन्सेका - ब्राझीलचे पहिले अध्यक्ष (जन्म: ५ ऑगस्ट १८२७)
  10. १८०६: चार्ल्स कुलोम - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १७३६)
  11. १३६३: चेन ओंलियांग - डहाण राजवटीचे संस्थापक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी