Today in History, Thursday, 15th September 2022: आज आहे जागतिक लोकशाही दिन,आज मराठी लेखक गंगाधर गाडगीळ यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

Today in History, Thursday, 15th September 2022: आज आहे जागतिक लोकशाही दिन, तसेच आज भारतीय अभियंता दिन आहे. आज भारतरत्न मोक्षमुंडम विश्वेश्वरैया आणि आज बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय मराठी लेखक दया पवार यांचा जन्मदिन तसेच मराठी लेखक गंगाधर गाडगीळ यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष.

today in history 15th September
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे जागतिक लोकशाही दिन, तसेच आज भारतीय अभियंता दिन आहे.
 • आज भारतरत्न मोक्षमुंडम विश्वेश्वरैया आणि आज बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन
 • तसेच मराठी लेखक गंगाधर गाडगीळ यांची पुण्यतिथी

Today in History, Thursday, 15th September 2022: आज आहे जागतिक लोकशाही दिन, तसेच आज भारतीय अभियंता दिन आहे. आज भारतरत्न मोक्षमुंडम विश्वेश्वरैया आणि आज बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन तसेच मराठी लेखक गंगाधर गाडगीळ यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष. (today is sir Mokshagundam Visvesvaraya birth anniversary and death anniversary of marathi writer gangadhari gadgil read today in history 15th September 2022)


१५ सप्टेंबर जन्म - दिनविशेष

 1. १९८९: चेतन रामलू - न्यूझीलंडचा संगीतकार
 2. १९५०: राजीव मल्होत्रा - भारतीय लेखक
 3. १९४६: माईक प्रॉक्टर - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच
 4. १९३९: जिम किमसे - AOLचे सहसंस्थापक (निधन: १ मार्च २०१६)
 5. १९३९: सुब्रमण्यम स्वामी - भाजप खासदार, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ
 6. १९३५: दया पवार - सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (निधन: २० डिसेंबर १९९६)
 7. १९२६: अशोक सिंघल - विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष (निधन: १७ नोव्हेंबर २०१५)
 8. १९२१: दाजी भाटवडेकर - रंगभूमी अभिनेते (निधन: २६ डिसेंबर २००६)
 9. १९०९: आप्पा कुंभार - स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील नेते (निधन: २३ डिसेंबर १९९८)
 10. १९०९: सी. एन. अण्णादुराई - तामिळनाडूचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३ फेब्रुवारी १९६९)
 11. १९०५: राजकुमार वर्मा - नाटककार, समीक्षक व कवी - पद्म भूषण (निधन: ५ ऑक्टोबर १९९०)
 12. १८८१: इटोर बुगाटी - बुगाटी कंपनीचे संस्थापक (निधन: २१ ऑगस्ट १९४७)
 13. १८८१: एत्तोरे बुगाटी - इटालियन ऑटोमोबाइल अभियंते
 14. १८७६: शरदचंद्र चट्टोपाध्याय - बंगाली लेखक, कादंबरीकार (निधन: १६ जानेवारी १९३८)
 15. १८६१: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया - स्थापत्य अभियंता आणि राजकारणी - भारतरत्न (निधन: १४ एप्रिल १९६२)
 16. १२५४: मार्को पोलो - इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी (निधन: ८ किंवा९ जानेवारी १३२४)


१५ सप्टेंबर घटना - दिनविशेष

 1. २०१३: निना दावुलुरी - या भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका बनल्या.
 2. २००८: लेहमन ब्रदर्स - या वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी जाहीर केली.
 3. २०००: ऑलिम्पिक - सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.
 4. १९८१: सँड्रा डे ओ'कॉनर - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या.
 5. १९७८: मुहम्मद अली - तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे पहिले बॉक्सर बनले.
 6. १९६८: झाँड ५ - सोव्हिएत संघाच्या अंतराळयानाचे प्रक्षेपण, चंद्राची प्रदक्षिणा करून परत पृथ्वीवर येणारे पहिले अंतराळयान आहे.
 7. १९५९: निकिता क्रुस्चेव्ह - हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले.
 8. १९५४: मर्लिन मन्रो - द सेव्हन इयर इच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मर्लिन मन्रो यांच्या आयकॉनिक स्कर्ट सीनचे चित्रीकरण करण्यात आले.
 9. १९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित - यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
 10. १९४८: ऑपरेशन पोलो - भारतीय सैन्याने जालना, लातूर, मोमिनाबाद, सुर्‍यापेट आणि नरकटपल्ली ही शहरे ताब्यात घेतली.
 11. १९४८: एफ-८६ सेबर - जेटविमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.
 12. १९४७: कॅथलीन टायफून, जपान - या वादळामुळे जपानमधील कांतो प्रदेशातील किमान १०७७ लोकांचे निधन.
 13. १९४४: दुसरे महायुद्ध - अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट आणि आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल क्यूबेक येथे ऑक्टगॉन परिषदेचा भाग म्हणून भेटले.
 14. १९३५: जर्मनी - देशाने स्वस्तिक असलेला नवीन राष्ट्रध्वज स्वीकारला.
 15. १९३५: जर्मनी - देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
 16. १९१६: पहिले महायुद्ध - सोम्मेची लढाई: पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर करण्यात आला.
 17. १८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.


१५ सप्टेंबर निधन - दिनविशेष

 1. २०२०: सदाशिव पाटील - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १० ऑक्टोबर १९३३)
 2. २०१८: फ्रिट्झ विंटरस्टेलर - मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (जन्म: २१ ऑक्टोबर १९२७)
 3. २०१२: के. एस. सुदर्शन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (जन्म: १८ जून १९३१)
 4. २००८: गंगाधर गाडगीळ - साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)
 5. १९९८: विश्वनाथ लवंदे - गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी