Today in History Monday, 22nd August 2022: आज आहे प्रसिद्ध लेखक अनंतमूर्ती यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  

today in history 22 august 2022
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे प्रसिद्ध लेखक अनंतमूर्ती यांची पुण्यतिथी
 • आज १८४८ साली अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
 • मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत मांढरे यांची पुण्यतिथी.

Today in History: Monday, 22nd  August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  

२२ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. १९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
 2. १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
 3. १९४४: दुसरे महायुद्ध - सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
 4. १९४२: दुसरे महायुद्ध - ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
 5. १९४१: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.
 6. १९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
 7. १८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
 8. १६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

२२ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९६४: मॅट्स विलँडर - स्वीडीश टेनिस खेळाडू
 2. १९५५: चिरंजीवी - अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री - पद्म भूषण
 3. १९३५: पंडित गोपीकृष्ण - कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. (निधन: १८ फेब्रुवारी १९९४)
 4. १९२०: डेंटन कुली - हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक (निधन: १८ नोव्हेंबर २०१६)
 5. १९१९: गिरिजाकुमार माथूर - हिंदी कवी (निधन: १० जानेवारी १९९४)
 6. १९१८: बानू कोयाजी - कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या - पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: १५ जुलै २००४)
 7. १९१५: जेम्स हिलियर - इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार (निधन: १५ जानेवारी २००७)
 8. १९१५: शंभू मित्रा - बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (निधन: १९ मे १९९७)
 9. १९०४: डेंग जियाओ पिंग - सुधारणावादी चिनी नेते (निधन: १९ फेब्रुवारी १९९७)
 10. १८९३: डोरोथी पार्कर - अमेरिकन लेखक
 11. १८४८: मेलविले एलिया स्टोन - शिकागो डेली न्यूजचे स्थापक (निधन: १५ फेब्रुवारी १९२९)
 12. १६४७: डेनिस पेपिन - प्रेशर कुकरचे निर्माते (निधन: २६ ऑगस्ट १७१३)

२२ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २०१४: यू. ए. अनंतमूर्ती - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (जन्म: २१ डिसेंबर १९३२)
 2. १९९९: सूर्यकांत मांढरे - मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते
 3. १९९५: पं. रामप्रसाद शर्मा - संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक
 4. १९८९: पं. कृष्णराव शंकर पंडित - ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: २६ जुलै १८९३)
 5. १९८२: एकनाथ रानडे - क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)
 6. १९८०: किशोर साहू - चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
 7. १९८०: जेम्स स्मिथ मॅकडोनेल - मॅकडोनेल विमानाचे निर्माते (जन्म: ९ एप्रिल १८९९)
 8. १९७८: जोमोके न्याटा - केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)
 9. १९६७: ग्रेगरी गुडविन पिंटस - जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते (जन्म: ९ एप्रिल १९०३)
 10. १९६३: विल्यम मॉरिस - मॉरिस मोटर्सचे संस्थापक (जन्म: १० ऑक्टोबर १८७७)
 11. १९५२: कीचिरो हिरानुमा - जपानी पंतप्रधान (जन्म: २८ सप्टेंबर १८६७)
 12. १९०३: रॉबर्ट आर्थर टॅलबोट - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान (जन्म: ३ फेब्रुवारी १८३०)
 13. १८१८: वॉरन हेस्टिंग्ज - भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: ६ डिसेंबर १७३२)
 14. १८१८: जनरल वॉरन हेस्टिंग्ज - भारताचे पहिले गव्हर्नर (जन्म: ६ डिसेंबर १७३२)
 15. १६०७: बर्थलॉम्व गोस्नेल - लंडन कंपनीची स्थापक
 16. १३५०: फिलिप (सहावा) - फ्रान्सचा राजा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी