आज आषाढी एकादशीच्या दिवशी काढा 'या' आकर्षक विठ्ठल रांगोळी डिझाईन्स

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 20, 2021 | 10:00 IST

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.

on the day of Ashadi Ekadashi, draw attractive Vitthal Rangoli
आज आषाढी एकादशीच्या दिवशी काढा 'या' आकर्षक विठ्ठल रांगोळी   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते
  • खास प्रसंगी आणि सणवाराला आपल्याकडे रांगोळी काढणे पवित्र आणि शुभ मानले जाते.
  • आषाढी एकादशी निमित्त सोप्या विठ्ठल रांगोळी डिझाईन्स

मुंबई : रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. गावच्या ठिकाणी अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. खास प्रसंगी आणि सणवाराला आपल्याकडे रांगोळी काढणे पवित्र आणि शुभ मानले जाते. 

आज आषाढी एकादशी साजरी करत आहोत. या मंगलदिनी दारासमोर रांगोळी काढली जाईल. ज्या महिलांना रांगोळी काढण्याची आवड आहे, अशा महिलांसाठी आम्ही खास आषाढी एकादशी निमित्त सोप्या विठ्ठल रांगोळी डिझाईन्स दाखवत आहोत.. 

आषाढी एकादशी विशेष विठ्ठल रांगोळी

 

सुपरीच्या मदतीने काढलेली रांगोळी

 

दोन रंग वापरून काढलेली रांगोळी

विष्णू देवतचे व्रत असलेल्या या आषाढी एकादशीला 'शयनी एकादशी' असेही म्हटले जाते. या दिवसापासून चातुर्मासास प्रारंभ होतो. त्यानंतर चार महिन्यांनी म्हणजे कार्तिकी एकादशी दिवशी चातुर्मास संपन्न होतो.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी