Today in History: Monday, 18th July 2022: आजच्या दिवशी झाली होती मुंबई विद्यापीठाची स्थापना, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज झाली होती मुंबई विद्यापीठाची स्थापना.
 • प्रियंका चोप्राचा वाढदिवस
 • आजच्या दिवशी रोम जळून खाक झाले होते.

Today in History: Monday, 18th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

१८ जुलै - दिनविशेष

 1. ६४: रोम, इटली - भीषण आग लागून जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.
 2. १९८०: रोहिणी-१ - भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
 3. १९७६: नादिया कोमानेसी - यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स खेळात पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवले.
 4. १९६८: इंटेल (Intel) - कंपनीची स्थापना.
 5. १९२५: माइन काम्फ - ऍडॉल्फ हिटलर यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित.
 6. १८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.
 7. १८५२: इंग्लंड - देशात निवडणुकीत गुप्त मतदान करण्यास सुरूवात झाली.

१८ जुलै जन्म - दिनविशेष

 1. १९८२: प्रियांका चोप्रा - भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० पीजेन्ट - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
 2. १९७२: सौंदर्या - अभिनेत्री (निधन: १७ एप्रिल २००४)
 3. १९७१: सुखविंदर सिंग - भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
 4. १९५०: रिचर्ड ब्रॅन्सन - व्हर्जिन ग्रुपचे स्थापक
 5. १९३५: जयेंद्र सरस्वती - ६९वे शंकराचार्य
 6. १९२७: मेहदी हसन - पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट (निधन: १३ जून २०१२)
 7. १९१८: नेल्सन मंडेला - दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी - भारतरत्न, नोबेल पुरस्कार (निधन: ६ डिसेंबर २०१३)
 8. १९१०: दप्तेंद प्रमानिक - भारतीय उद्योजिका (निधन: १५ डिसेंबर १९८९)
 9. १९०९: बिश्नु डे - भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक (निधन: ३ डिसेंबर १९८३)
 10. १९०९: मोहम्मद दाऊद खान - अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष (निधन: २८ एप्रिल १९७८)
 11. १८४८: डब्ल्यू. जी. ग्रेस - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: २३ ऑक्टोबर १९१५)
 12. १८१८: लुईस गेरहार्ड डी गेर - स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: २४ सप्टेंबर १८९६)

१८ जुलै निधन - दिनविशेष

 1. २०२०: संजीव सॅम गंभीर - भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते (जन्म: २३ नोव्हेंबर १९६२)
 2. २०१३: वाली - भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
 3. २०१२: राजेश खन्ना - सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण (जन्म: २९ डिसेंबर १९४२)
 4. २००१: रॉय गिलख्रिस्ट - वेस्टइंडीजचे क्रिकेटपटू (जन्म: २८ जून १९३४)
 5. १९९४: मुनीस रझा - भारतीय शैक्षणिक प्रशासक, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे सहसंस्थापक
 6. १९८९: गोविंद भट - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक
 7. १९७४: एस. व्ही. रंगा राव - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: ३ जुलै १९१८)
 8. १९६९: अण्णाणाऊ साठे - लेखक, कवी, समाजसुधारक (जन्म: १ ऑगस्ट १९२०)
 9. १८९२: थॉमस कूक - पर्यटन व्यवस्थापक (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)
 10. १८१७: जेन ऑस्टीन - इंग्लिश लेखिका (जन्म: १६ डिसेंबर १७७५)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी