Today in History Thursday, 22nd September 2022: आज आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती, तसेच मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची पुण्यतिथी

आज २२ सप्टेंबर २०२२. आज शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे. तसेच मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची पुण्यतिथी. आज सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाला होता. 

karmaveer bhaurao patil
कर्मवीर भाऊराव पाटील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे.
  • मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची पुण्यतिथी.
  • आज सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाला होता. 

Today in History: Thursday, 22nd September 2022: आज २२ सप्टेंबर २०२२. आज शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे. तसेच मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची पुण्यतिथी. आज सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाला होता. (todays is karmaveer bhaurao patil birth anniversary and actress ashalata vabgaonkar death anniversary know more Today in History Thursday, 22nd September 2022)

अधिक वाचा :  Astro Tips For Money: रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये करा 'हे' काम, तिजोरीत कधीही होणार नाही खडखडाट

२२ सप्टेंबर जन्म - दिनविशेष

  1. १९६४: नरेंदर थापा - भारतीय फुटबॉलपटू (निधन: ५ ऑगस्ट २०२२)
  2. १९२३: रामकृष्ण बजाज - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती
  3. १९२२: चेन निंग यांग - चिनी भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
  4. १९१५: अनंत माने - मराठी चित्रपट दिग्दर्शक (निधन: ९ मे १९९५)
  5. १९०९: विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी - विनोदी लेखक, (निधन: ३ ऑक्टोबर १९५९)
  6. १९०९: सख्याहरी - विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक (निधन: ३ ऑक्टोबर १९५९)
  7. १८८७: कर्मवीर भाऊराव पाटील - थोर शिक्षणतज्ज्ञ - पद्म भूषण (निधन: ९ मे १९५९)
  8. १८८५: बेन चीफली - ऑस्ट्रेलियाचे १६वे पंतप्रधान
  9. १८७८: योशिदा शिगेरू - जपानचे पंतप्रधान
  10. १८७६: आंद्रे तार्द्यू - फ्रांसचे पंतप्रधान
  11. १८६९: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री - कायदेतज्ञ, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष (निधन: १७ एप्रिल १९४६)
  12. १८२९: टू डुक - व्हिएतनामचा राजा
  13. १७९१: मायकेल फॅरेडे - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (निधन: २५ ऑगस्ट १८६७)

अधिक वाचा : Skin Care Tips: ग्लोइंग स्किनसाठी लावा लिंबू- मेथीचा Face Pack, चमकेल तुमचा चेहरा


२२ सप्टेंबर घटना - दिनविशेष

  1. २००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.
  2. १९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.
  3. १९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  4. १९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
  5. १९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.
  6. १९६५: दुसरे काश्मीर युद्ध - संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
  7. १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
  8. १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  9. १४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

अधिक वाचा : Kitchen hack: काळपट, गंजलेली कढई स्वच्छ काही मिनिटातच; घरगुती Tips ने होईल चकचकीत

२२ सप्टेंबर निधन - दिनविशेष

  1. २०२०: आशालता वाबगावकर - भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: २ जुलै १९४१)
  2. २०११: अरिसिदास परेरा - केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: १७ नोव्हेंबर १९२३)
  3. २०११: मन्सूर अली खान पतौडी - भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब - पद्मश्री (जन्म: ५ जानेवारी १९४१)
  4. २००७: खेळाडू बोडिन्हो - ब्राझिलचे फुटबॉल
  5. २००२: विल्यम रोसेनबर्ग - डंकिन डोनट्सचे स्थापक (जन्म: १० जून १९१६)
  6. १९९४: जी. एन. जोशी - भावगीतगायक व संगीतकार (जन्म: ६ एप्रिल १९०९)
  7. १९९१: दुर्गा खोटे - मराठी अभिनेत्री (जन्म: १४ जानेवारी १९०५)
  8. १९७०: शरदेंन्दू बंदोपाध्याय - बंगाली लेखक (जन्म: ३० ऑगस्ट १८९९)
  9. १९६९: ऍडोल्फो लोपे मटियोस - मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
  10. १९६५: ओथमर अम्मांन - जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार (जन्म: २६ मार्च १८७९)
  11. १९५६: विल्हेल्म ऑस्टवाल्ड - नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २ सप्टेंबर १८५३)
  12. १९५२: कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग - फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १८६५)
  13. १९३३: कामिनी रॉय - ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला (जन्म: १२ ऑक्टोबर १८६४)
  14. १८२८: शक - झुलु सम्राट
  15. १५३९: गुरू नानक देव - शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)
  16. १५२०: सलीम (पहिला) - ऑट्टोमन सम्राट

अधिक वाचा :  प्रत्येक घरात असले पाहिजे मधुमेह नियंत्रणात ठेवणारे औषधी झाड

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी