Travel To Offbeat Hill Stations : उन्हाळ्यात गर्दीपासून दूर चला थंड हवेच्या ठिकाणी 

TRAVEL TO OFFBEAT HILL STATIONS IN SUMMER VACATION : भारतात कोरोना संकट नियंत्रणात आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. अशा वेळी गर्दीपासून दूर थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी निवडक उत्तम ठिकाणं.

TRAVEL TO OFFBEAT HILL STATIONS IN SUMMER VACATION
Travel To Offbeat Hill Stations : उन्हाळ्यात गर्दीपासून दूर चला थंड हवेच्या ठिकाणी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Travel To Offbeat Hill Stations : उन्हाळ्यात गर्दीपासून दूर चला थंड हवेच्या ठिकाणी
  • एकटेच अथवा कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत फिरण्यासाठी येऊ शकता
  • भारतातील ऑफबीट हिल स्टेशन...

TRAVEL TO OFFBEAT HILL STATIONS IN SUMMER VACATION : भारतात कोरोना संकट नियंत्रणात आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. अशा वेळी गर्दीपासून दूर थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी निवडक उत्तम ठिकाणं. भारतातील ही ठिकाणं आपला मूड पिफ्रेश करतील. या ठिकाणी आपण एकटेच अथवा कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत फिरण्यासाठी येऊ शकता. ही आहेत भारतातील ऑफबीट हिल स्टेशन...

  1. चटपाल, जम्मू काश्मीर : काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग असे म्हणतात. जम्मू काश्मीर हे फक्त भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांचेही एक आवडते ठिकाण आहे. या जम्मू काश्मीरमध्येच चटपाल हे एक ऑफबीट हिल स्टेशन आहे. निसर्ग सौंदर्यानं बहरलेलं, थंड पाण्याच्या वर्षभर वाहणाऱ्या नद्यांनी नटलेलं एक अप्रतिम थंड हवेचं ठिकाण. गर्दीपासून दूर असलेल्या हिल स्टेशनवर जाऊ इच्छिणाऱ्यांनी एकदा  चटपाल या ठिकाणाला हमखास भेट द्यावी. विमानाने अथवा रेल्वेन श्रीनगरमध्ये आलेली व्यक्ती तिथून प्रायव्हेट कॅब करून थेट चटपालला जाऊ शकते. चटपालमध्ये जम्मू काश्मीर टुरिझम डिपार्टमेंटचे कॉटेज आहे. या कॉटेजमध्ये राहून आपण चटपालमध्ये फिरू शकता. 
  2. अस्कोट, उत्तराखंड : भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमेजवळ उत्तराखंडमध्ये अस्कोट हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे हिमालयातील एक ऑफबीट हिल स्टेशन आहे. विपुल वनराई असलेल्या या ठिकाणी निवांत वाटतं. मनावरचा ताण एकदम दूर होतो. अनेकजण लाइफ पार्टनर सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी अस्कोटला भेट देणे पसंत करतात. आपण उत्तराखंडमध्ये कुमाऊं भागातील काठगोदाम पर्यंत रेल्वेने येऊ शकता. तिथून अस्कोटसाठी प्रायव्हेट कॅब करावी लागेल. देहरादून (डेहराडून) किंवा पिथौरागड या ठिकाणी विमानाने आलात तर तिथून पण अस्कोटसाठी प्रायव्हेट कॅब करता येते. अस्कोटमध्ये पीडब्ल्यूडीचे रेस्ट हाऊस आहे. या ठिकाणी मुक्काम करणे शक्य आहे. 
  3. केम्म्रगुंडी, कर्नाटक : केम्म्रगुंडी हे कर्नाटकमधील ऑफबीट हिल स्टेशन म्हणून  ओळखले जाते. कर्नाटकमधील चिक्कमंगळुरू जिल्ह्यात हे ठिकाण आहे. उटी आणि कोडाईकनाल येथे सुटीच्या दिवसांत हमखास गर्दी असते. अशा गर्दीच्या वेळी केम्म्रगुंडी या थंड हवेच्या ठिकाणाला भेट द्यावी. विमानाने बंगळुरूत आलेली व्यक्ती तिथून कॅब करून २७३ किमी प्रवास करून केम्म्रगुंडी येथे येऊ शकते. चिक्कमंगळुरू जिल्ह्यापर्यंत पोहोचणे शक्य असेल तर जिल्ह्यातील मुख्य बस डेपोतून केम्म्रगुंडीसाठी बसची सोय आहे. बसने ५३ किमी प्रवास करून आपण केम्म्रगुंडी येथे पोहोचू शकता. लिंगदहली येथून पण बसने केम्म्रगुंडी येथे जाणे शक्य आहे. केम्म्रगुंडी येथे सरकारी गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करू शकता.
  4. कल्पा , हिमाचल प्रदेश : कल्पा हे हिमाचल प्रदेशमधील ऑफबीट हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण किन्नोर जिल्ह्यात आहे. सतलुज नदी किनारी हे ठिकाण वसले आहे. सफरचंदाच्या बागा, घनदाट जंगल असे मनोहारी दृश्य या ठिकाणी सहज अनुभवता येते. साहसी खेळांची आवड असलेल्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. सिमला किंवा मनालीतून रस्ते मार्गाने कल्पामध्ये येणे शक्य आहे. दिल्ली ते रिकॉन्ग पियो बसने आपण येऊ शकता. कल्पा आणि रिकॉन्ग या दोन्ही ठिकाणी राहण्यासाठी अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. 
  5. तुंगी, महाराष्ट्र : तुंगी हे महाराष्ट्रातील ऑफबीट हिल स्टेशन म्हणून  ओळखले जाते. तुंगी हे ठिकाण पुणे जिल्ह्यापासून ८५ किमी अंतरावर आहे. निसर्ग सौंदर्यानं नटलेलं तुंगी आराम करण्यासाठी आणि मूड रिफ्रेश करण्यासाठी कमी गर्दी असलेले आणि अतिशय निवांत असे एक उत्तम ठिकाण आहे. पुणे ते तुंगी हा प्रवास रस्ते मार्गाने करता येतो. तुंगीत राहण्यासाठी अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. लोणावळा, खंडाळा आणि महाबळेश्वरपेक्षा तुंगी या ठिकाणाला किमान एकदा तरी जरूर भेट द्या.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी