लेडी गागाच्या दोन कुत्र्यांची चोरी, शोधणाऱ्यास मिळेल ३.५ कोटींचे बक्षिस

लाइफफंडा
Updated Feb 27, 2021 | 10:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रसिद्ध पॉप गायिका आणि ऑस्कर विजेती लेडी गागा हिचे दोन पाळीव कुत्रे चोरले आहेत. कुत्रे शोधून देणाऱ्यास ३.५ कोटींचे बक्षिस देण्याची घोषणा लेडी गागाने केली

two pet dogs of lady gaga are stolen, Finder will be awarded
लेडी गागा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • प्रसिद्ध पॉप गायिका लेडी गागाच्या दोन कुत्र्यांची चोरी
  • शोधणाऱ्यास मिळेल ३.५ कोटींचे बक्षिस
  • कुत्रे फिरवणाऱ्यास गोळी घालून पळवले कुत्रे

नवी दिल्ली - प्रसिद्ध पॉप गायिका आणि ऑस्कर विजेती लेडी गागा हिचे दोन पाळीव कुत्रे चोरले आहेत. चोरांनी लेडी गागाच्या डॉगवॉकरला (कुत्रे फिरवणारी व्यक्ती) गोळी मारून त्यांचे महागड्या जातीचे कुत्रे चोरले. कुत्रे शोधून देणाऱ्यास ३.५ कोटींचे बक्षिस देण्याची घोषणा लेडी गागाने केली आहे. ही बातमी ऐकून लोक हैराण झाले आहेत. कुत्र्यांवरील या खर्चाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तर काही जणांनी ३.५ कोटींचे बक्षिस मिळवम्यासाठी कुत्रे् शोधायला सुरुवात केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Miss Asia (@missasiaxoxo)

डॉगवॉकर लेडी गागाचे प्रिय कुत्रे कोजी आणि गुस्ताव यांना फिरवायला घेऊन  गेला होता. अज्ञात व्यक्तीने डॉगवॉकरला गोळ्या घालून कुत्रे चोरले. हे दोन्ही कुत्रे फ्रेंच बुलडॉग प्रजातिचे होते. हे खूप महागडे असतात.  

लेडी गागाचे वडील जो जर्मनोटाने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की, लॉस अँजेलिसमध्ये झलेल्या घटनेत त्यांचा डॉगवॉकर रॉयन फिशर  या गोळीने जखमी झाला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. लेडी गागा रोममध्ये शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण तिला घटनेची माहिती देण्यात आली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

सेलिब्रिटी वेबसाइट टीएमजीनुसार लेडी गागाकडे तीन कुत्रे होते, एशिया नावाचा तीसरा कुत्रा पळून जाण्यात यशस्वी झाला.  लेडी गागासोबतच सर्व कुटुंब या कुत्र्यांना लहान मुलांसारखे सांभाळत होते. यामुळे आमच्या मुलांनाच हिरावून नेल्यासारखे वाटत आहे. आमच्या घरी दुःखाचे वातावरण आहे, असे लेडी गागाच्या वडिलांनी सांगितले.

जो कुणी माझ्या कुत्र्यांनी परत आणून देईल त्याला ३.५ कोटींचे बक्षिस देईन अशी घोषणा लेडी गागाने केली आहे. या संदर्भात संपर्क करण्यासाठी लेडी गागाने KojiandGustav@gmail.com हा ई -मेल बनवला आहे. यावर गायब झालेल्या कुत्र्यांची माहिती देता येऊ शकते. लेडी गागा त्यांच्या कुत्र्यांवर खूप प्रेम करतात. त्यांचे चाहतेही हे पाहून चकित होतात. त्या वेळोवेळी आपल्या कुत्र्यांचे फोटो समाजमाध्यमांवर टाकत असतात. आणि त्यांच्या या कुत्र्यांचे चाहतेसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी