Gautam Gambhir Daughter Name : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला दोन मुली आहेत. आपल्या दोन्ही मुलींची नावं त्याने फारच हटके ठेवली आहेत. गौतम गंभीरने आपल्या मुलींची नावं अशी ठेवली आहेत, जी भारतात फारशी कुठे ऐकायला मिळत नाहीत. गौतम गंभीरच्या मोठ्या मुलीचं नाव आहे आजीन, तर धाकट्या मुलीचं नाव त्याहूनही भन्नाट आहे. धाकट्या मुलीचं नाव त्याने ठेवलं आहे अनाइजा. या दोन्ही नावांचं सर्वांकडून कौतुक होत असून या दोन्ही नावांना फारच सुंदर अर्थ आहे.
गौतम गंभीरच्या मोठ्या मुलीचं नाव आहे आजीन. आजीन हा मूळ अरबी शब्द आहे. या शब्दाचा अर्थ होतो सजावट. तर दुसऱ्या मुलीचं गौतम गंभीरनं नाव ठेवलं आहे अनाइजा. या शब्दाचा अर्थही फारच सुरेख आहे. अनाइजा शब्दाचा अर्थ होतो सौंदर्य किंवा दया. दया आणि सौंदर्य या दोन्ही एकमेकांत गुंतलेल्या भावना असून एकामुळे दुसऱ्याचं अस्तित्व अधिक शाश्वत होत असल्याचं तत्वज्ञ सांगतात. या दोन्ही अलौकिक भावनांच्या अर्थाचा साज ल्यालेलं हे नाव सर्वांना भुरळ घालत आहे.
अधिक वाचा - Baby Names list : आपल्या बाळासाठी निवडा असं युनिक आणि मॉडर्न नाव !
नेहमीची आणि रुळलेली नावं ठेवण्याऐवजी ट्रेंडिंग नावं ठेवणं अनेक पालक सध्या पसंत करत आहे. गेल्या काही वर्षात जन्माला आलेल्या मुलांची नावं पाहिली तर पठडीतील नावांऐवजी हटके नावं ऐकायला मिळतात. अशी नावं ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं आणि नव्या अर्थाची नवी नावं समोर येतात. देशाच्या आणि प्रांताच्या सीमा ओलांडून जगभरात जे जे चांगलं आहे, ते ते घेण्याची वृत्ती यामधून विकसित होत असून शब्दांना आणि अर्थांना कुठल्याच सीमेचं बंधन असू शकत नाही, असा विचार बहुतांश पालक सध्या करताना दिसत आहे. तुम्हीही तुमच्या मुलींसाठी वेगळ्या नावांचा विचार करत असाल, तर काही पर्याय आणि त्या नावांचे अर्थ खाली दिले आहेत.