Homemade Natural Hair Conditioner : कोरड्या केसांची समस्या सोडविण्यासाठी होममेड हेअर कंडीशनर

Use Natural Homemade Hair Conditioner to get rid of dry hair problem : आपल्या केसांना अयोग्य असलेले शाम्पू आणि हेअर कंडीशनर वापरले अथवा धावपळीमुळे केसांची निगा योग्य प्रकारे राखली नाही. शाम्पूने केस धुतल्यानंतर योग्य प्रकारचा होममेड हेअर कंडीशनर वापरुन केसांची निगा राखणे. शक्य आहे.

Use Natural Homemade Hair Conditioner to get rid of dry hair problem
कोरड्या केसांची समस्या सोडविण्यासाठी होममेड हेअर कंडीशनर 
थोडं पण कामाचं
  • कोरड्या केसांची समस्या सोडविण्यासाठी होममेड हेअर कंडीशनर
  • शाम्पूने केस धुतल्यानंतर योग्य प्रकारचा होममेड हेअर कंडीशनर वापरुन केसांची निगा राखणे. शक्य
  • नियमित होममेड हेअर कंडीशनर वापरल्यास केसांची चमक वाढेल

Use Natural Homemade Hair Conditioner to get rid of dry hair problem : मुंबई : ब्रँडेड शाम्पू आणि हेअर कंडीशनर वापरुन केसांची काळजी घेणारे अनेकदा स्वतःच्या केसांसाठी नक्की कोणता शाम्पू आणि हेअर कंडीशनर योग्य आहे याचा विचार करत नाहीत. खरेदी करताना ग्राहकांवर जाहिरातीचा नाही तर सवलतीचाच प्रभाव दिसून येतो. या प्रभावात चुकीचा शाम्पू आणि हेअर कंडीशनर खरेदी करुन वापरला तर ग्राहकाचे आर्थिक नुकसान होते शिवाय त्याच्या केसांची हानी होते. 

आपल्या केसांना अयोग्य असलेले शाम्पू आणि हेअर कंडीशनर वापरले अथवा धावपळीमुळे केसांची निगा योग्य प्रकारे राखली नाही तर अनेकदा केस कोरडे होतात. केस लवकर तुटणे किंवा गळणे, केस लवकर पांढणे होणे, केस निस्तेज होणे, केस दुभंगणे अशा समस्या सुरू होतात. केस लवकर मृत झाल्यास कोणतीही हेअर स्टाइल करणे आणि आकर्षक दिसणे कठीण होऊन बसते. यावर उपाय म्हणजे शाम्पूने केस धुतल्यानंतर योग्य प्रकारचा होममेड हेअर कंडीशनर वापरुन केसांची निगा राखणे. यासाठी घरीच तयार केलेला होममेड हेअर कंडीशनर वापरणे शक्य आहे. 

होममेड हेअर कंडीशनर तयार करण्याची कृती अतिशय सोपी आहे. एक पिकलेलं केळं एका भांड्यात कुस्करा. आता केळ्यावर एक चमचा मध आणि दोन मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल (ऑलिव्ह तेल / जैतून तेल) ओतून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. घरगुती हेअर कंडीशनर अर्थात होममेड हेअर कंडीशनर तयार.

केसांना शाम्पू लावून धुतल्यानंतर लगेच ओल्या केसांना होममेड हेअर कंडीशनर लावा. हे कंडीशनर किमान २० ते ३० मिनिटे तसेच ठेवा. या कालावधीत शॉवर कॅपने केस व्यवस्थित झाकून घ्या. नंतर शॉवर कॅप काढा आणि कंडिशनर लावलेले केस थोडा शाम्पू लावून स्वच्छ धुवा. ही कृती आठवड्यातून किमान दोन वेळा या पद्धतीने सुरू ठेवल्यास थोड्याच दिवसांत केसांच्या अनेक समस्या कमी झाल्याचे दिसून येईल.

नियमित होममेड हेअर कंडीशनर वापरल्यास केसांची चमक वाढेल. केस गळणे-तुटणे कमी होईल. केस आणखी आकर्षक दिसू लागतील. केसांची वाढ नैसर्गिकरित्या आणि वेगाने सुरू होईल.

अंडं फोडून त्यातील पिवळा भाग एका वाटीत घ्या. यात ताजे दही आणि एक मोठा चमचा खोबरेल तेल ओता आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. केसांना शाम्पू लावून धुतल्यानंतर लगेच ओल्या केसांना होममेड हेअर कंडीशनर हे कंडीशनर किमान २० ते ३० मिनिटे तसेच ठेवा. या कालावधीत शॉवर कॅपने केस व्यवस्थित झाकून घ्या. नंतर शॉवर कॅप काढा आणि कंडिशनर लावलेले केस थोडा शाम्पू लावून स्वच्छ धुवा. ही कृती आठवड्यातून किमान दोन वेळा या पद्धतीने सुरू ठेवल्यास थोड्याच दिवसांत केसांच्या अनेक समस्या कमी झाल्याचे दिसून येईल.

लक्षात ठेवा दीर्घकाळ टिकविण्यासाठी तयार केलेले रसायन मिश्रीत शाम्पू आणि हेअर कंडीशनर वापरण्यापेक्षा नियमित होममेड हेअर कंडीशनर वापरा. यातून केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी