Parenting Tips : या टिप्स वापरून मुलांना बनवता येईल समजूतदार...रागावण्याची असणार नाही आवश्यकता

Good Parenting : पालक (Parents) म्हणून मुलांना वाढवणे, त्यांचे संगोपन करणे, त्यांच्यावर संस्कार करणे हे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचे काम आहे. याला अनेकदा नेहमीचेच किंवा सहजपणे होणाऱ्या गोष्टी समजले जाते. मात्र तसे नसते. मुलांच्या संगोपनासाठी खास प्रयत्न करावे लागतात. कारण मुले स्वभावाने चंचल असतात. मुलांशी जास्त कठोरपणे वागल्याने मुले अधिक मस्तीखोर, खोडकर होण्याचीही भीती असते. अशावेळी मुलांना कसे हाताळावे यासाठीच्या टिप्स (Parenting Tips)जाणून घ्या.

Parenting Tips
पालकत्वासाठीच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • मुलांना शिस्त लावणे सोपे नसते
  • मुलांना प्रेमाने हाताळल्यास मुले आपले म्हणणे ऐकतात
  • मुलांना अधिक समजूतदार बनवण्याच्या टिप्स

Parenting Tips For Kids Development : नवी दिल्ली : मुलांचा स्वभाव समजणे आणि त्यांना शांतपणे हाताळणे हे काही सोपे काम नसते. पालक (Parents) म्हणून मुलांना वाढवणे, त्यांचे संगोपन करणे, त्यांच्यावर संस्कार करणे हे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचे काम आहे. याला अनेकदा नेहमीचेच किंवा सहजपणे होणाऱ्या गोष्टी समजले जाते. मात्र तसे नसते. मुलांच्या (Children) संगोपनासाठी खास प्रयत्न करावे लागतात. कारण मुले स्वभावाने चंचल असतात. ते सतत काहीतरी खोड्या करत असतात, काहीकरी करण्याच्या मनस्थितीत असतात. त्यांच्या काही खोड्या पालकांना चांगल्या वाटतात तर काही खोड्यांमुळे पालक त्रस्त होतात. परिणामी पालक त्यांना रागवतात, प्रसंगी मुलांशी कठोरपणे वागतात. मात्र मुलांशी जास्त कठोरपणे वागल्याने मुले अधिक मस्तीखोर, खोडकर होण्याचीही भीती असते. अशावेळी मुलांना कसे हाताळावे यासाठीच्या टिप्स (Parenting Tips)जाणून घ्या. या टिप्स वापरून तुम्ही मुलांना अधिक हुशार आणि समजूतदार बनवू शकाल. (Use these parenting tips to make children more disciplined without scolding)

अधिक वाचा : Thane : शिंदे गटाला गळती, माजी नगरसेविकेने शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर बांधलं शिवबंधन

मुलांना समजूतदार बनवण्याच्या टिप्स -

मुलांना ठरवू द्या- 
कोणतीही गोष्ट मुलांना भीती दाखवून किंवा रागावून करवून घेण्याऐवजी त्यांना ती प्रेमाने समजावून सांगा. मुलांना ऑर्डर देण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजावून सांगा. घरातील लहान सहान कामे करण्यासंदर्भात मुलांनाच ठरवू द्या. यामुळे ते मनापासून काम करतील, त्यांना चांगली सवय लागेल, शिवाय ते तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतील. 

अधिक वाचा : Crime News जन्मदात्या बापाने 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा रचला कट, पोलीस घेतायेत मुलीचा शोध

नकारामागचे कारण जाणून घ्या- 
एखाद्या प्रसंगी मुलांनी काही काम करण्यास नकार दिल्यास मुलांना रागावण्याऐवजी त्यांनी नकार का दिला हे जाणून घ्या. त्यांची समस्या समजून घ्या. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा.

प्रसंगी कौतुक करा-
वेळेवेळी मुलांचे कौतुक केल्याने त्यांची ते काम करण्याची इच्छाशक्ती वाढते, त्यांचा उत्साह वाढतो. कौतुक केल्यावर मुले स्व:ताहून कामे करतात. ते कोणतीही गोष्ट मनापासून करतात.

मुलांकडे लक्ष देणे- 
पालकांनी मुलांना पुरेसा वेळ देणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या कामात कितीही व्यस्त असलात तरी मुलांना आवर्जून वेळ द्या. जास्त शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास मुले बिघडू शकतात. मुलांनी खोड्या केल्या तरी त्यांना प्रेमानेच सांगण्याचा प्रयत्न करा.

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

खोडसाळपणाचे तोटे समजावून सांगा- 
मुले म्हटली की खोडसाळपणा आलाच. मुले ही खोड्या करतातच. मात्र जर एखादे मूल जास्तच खोड्या करत असेल तर त्याला सतत रागावण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा. त्याचे तोटे त्याच्या लक्षात आणून द्या. मुलांना एखादी गोष्ट समजावून सांगितल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होतो.

अर्थात सर्वच पालक (Parents) काही परिपूर्ण नसतात. मुलांचे संगोपन करता करताच अनेक पालक अनुभवांमधून रोज नवा धडाही शिकत असतात. त्यामुळे पालकांकडूनही चुका होण्याची शक्यता असते. मुलांचे संगोपन करताना काही कमतरता राहून गेल्याची शक्यता असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी