Study Tips: पाठांतर करूनदेखील विस्मरण होते का? मग या 5 टिप्सने वाढवा स्मरणशक्ती

Study Tips : अनेकांना खूप अभ्यास केल्यानंतरदेखील लक्षात राहत नाही. आता जर वाचवल्यावरदेखील एखादी गोष्ट विसरली जात असेल तर काय करायचे काय? तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा तोंड द्यावे लागते आहे का? यावर मार्ग काढण्यासाठी काही टिप्स वापरा.

Study Tips
स्टडी टिप्स 
थोडं पण कामाचं
  • अभ्यास करताना स्मरणशक्तीची अडचण
  • अनेकदा अभ्यास करून लक्षात राहत नाही
  • अभ्यास करण्यासाठीच्या सोप्या टिप्स

How to study effectively: नवी दिल्ली : अभ्यास करताना महत्त्वाची ठरणारी एक बाब म्हणजे स्मरणशक्ती (Memory). अनेकांना खूप अभ्यास केल्यानंतरदेखील लक्षात राहत नाही. आता जर वाचवल्यावरदेखील एखादी गोष्ट विसरली जात असेल तर काय करायचे काय? तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा तोंड द्यावे लागते आहे का? यावर मार्ग काढण्यासाठी आपण काही टिप्स (Study Tips) पाहूया ज्यामुळे तुम्हाला स्मरणशक्ती वाढवता येईल. पाहूया अशा 5 जबरदस्त टिप्स. (Use these study tips to improve memory)

अधिक वाचा : Relationship Tips: पुरुषांच्या ‘या’ सवयी जातात पार्टनरच्या डोक्यात, तुटू शकतं नातं

अभ्यास करताना स्मरणशक्ती वाढवण्याच्या टिप्स-

अभ्यास करताना ब्रेक घ्या
अनेकदा अभ्यास करकताना खूप वेळ एकसलग केला जातो. त्यामुळे डोक्यावर एकदम ताण येतो. त्यामुळे अनेकांना गोष्टी लक्षात राहत नाहीत. अभ्यासादरम्यान स्मरणशक्ती कमकुवत होण्याचे एक कारण म्हणजे सततचे वाचन. म्हणूनच जर खूप वेळ अभ्यास करून लक्षात राहत नसेल तर अभ्यासादरम्यान लहान ब्रेक घेणे खूप महत्वाचे आहे. सतत वाचनामुळे अनेक वेळा गोष्टी लक्षात राहत नाहीत. विश्रांती घेतल्याने एकाग्रता राखली जाते. यासोबतच अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमताही वाढते.

अधिक वाचा : Relationship Tips: घरी कांदे पोहेचा कार्यक्रम आहे; मग करा ही चार कामे , लगेच धराल लग्नाची तारीख

स्वत:च्या नोट्स 
अनेकदा विद्यार्थ्यांना नोट्स बनवण्याचा कंटाळा असतो. त्यामुळे ते स्वतःच्या नोट्स बनवण्याऐवजी इतरांच्या नोट्सच्या फोटोकॉपी बनवतात. मात्र ही चुकीची पद्धत आहे. प्रत्येकजण आपल्या आकलनाप्रमाणे नोट्स बनवतो. इतरांच्या नोट्स वाचण्यात जास्त वेळ लागतो आणि समजण्यात अडचणी येतात. अभ्यास करताना स्वतःच्या नोट्स बनवा. नोट्स बनवण्याच्या प्रक्रियेमुळे अभ्यास लक्षात ठेवणे सोपे होईल. शिवाय यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल. 

पेन्सिलचा वापर करा
अभ्यास करताना एकाग्रता होत नाही. काही मुलांचे मन अभ्यासात लागत नाही. यावर एक उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा हातात पेन्सिल ठेवा. यामुळे पुस्तक किंवा नोट्स वाचताना कोणताही महत्त्वाचा मुद्दा समोर आला की तुम्हाला ते अधोरेखित करता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. यामुळे गोष्टी लगेच आणि दीर्घकाळ लक्षात राहतील.

अधिक वाचा :   Eknath Shinde : राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाला आव्हान 

ग्रुप स्टडी
काहींना एकट्याने अभ्यास करताना अनेक अडचणी येतात. अशावेळी ग्रुपने अभ्यास करणे फायद्याचे ठरते. वाचलेले आठवत नसेल तर गोष्टी ऐकून किंवा संभाषणातून लक्षात ठेवता येतात. आपण मित्रांसोबत जर अभ्यासातील काही मुद्द्यांची चर्चा केली तर ते लक्षात राहते.  म्हणूनच मित्रांसोबत ग्रुप स्टडी दरम्यान तुम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. ग्रुप स्टडीतील चर्चेदरम्यान, चर्चा झालेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात.

उजळणी महत्त्वाची 
अनेकदा फक्त एकदा एखाद्या विषयाचा अभ्यास करून भागत नाही. त्यामुळे तुम्ही वाचलेल्या गोष्टींची उजळणी करत रहा. उजळणीमुळे गोष्टी लक्षात राहतात आणि पक्क्या होतात. म्हणूनच अभ्यास करताना एक उजळणी वेळापत्रक बनवा आणि काही दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा तुमच्या अभ्यासक्रमाची उजळणी करा. अभ्यासादरम्यान या टिप्सचा वापर केल्यास तुमची स्मरणशक्ती सुधारेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी