Office Tips : ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी मात्र तरीही आरामात राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Office Wear Tips : चांगला ड्रेसिंग सेन्स (Dressing sense)असणारे, योग्य कपड्यांची निवड असणाऱ्यांचा वेगळाच प्रभाव पडत असतो. अगदी कार्यालयातदेखील ज्यांचा ड्रेसिंग सेन्स चांगला असतो, जे स्टायलिश (Stylish)राहतात त्यांचा इतरांवर प्रभाव पडतो. तुमचे दिसणे खूप महत्त्वाचे आहे. ऑफिसमध्ये कशा प्रकारे कपडे (Office wear) घालावेत, स्टायलिश राहत आपल्याला ते गैरसोयीचे होणार नाही याबद्दल जाणून घ्या.

Office wear
कार्यालयात कसे कपडे घालावे 
थोडं पण कामाचं
  • कपडे हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग
  • ऑफिसमध्येही योग्य पद्धतीने कपडे परिधान केल्याचा असतो प्रभाव
  • ऑफिसमध्ये स्टायलिश कसे राहावे याच्या टिप्स

Office Wear Ideas:नवी दिल्ली : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपला पोषाख. आपण कसे कपडे  घालतो, त्यांची रंगसंगती कशी असते, कोणती फॅशन (Fashion) वापरतो याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. चांगला ड्रेसिंग सेन्स (Dressing sense)असणारे, योग्य कपड्यांची निवड असणाऱ्यांचा वेगळाच प्रभाव पडत असतो. अगदी कार्यालयातदेखील ज्यांचा ड्रेसिंग सेन्स चांगला असतो, जे स्टायलिश (Stylish)राहतात त्यांचा इतरांवर प्रभाव पडतो. तुम्ही कसे कपडे परिधान करता तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. त्यामुळे ते निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुमचे कपडे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व बनवून जीवनात पुढे जाण्याचा मार्ग सोपा बनवू शकतात. कारण तुमचे दिसणे खूप महत्त्वाचे आहे. ऑफिसमध्ये कशा प्रकारे कपडे (Office wear) घालावेत, स्टायलिश राहत आपल्याला ते गैरसोयीचे होणार नाही याचीही कशी काळजी घ्यावी यासंदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. (Use these tips Office for dressing wear) 

अधिक वाचा - Dark Neck Removal: मानेवर जमा झाला आहे काळा थर...मग हे सोपे घरगुती उपाय दूर करतील काळेपणा

ऑफिसमधील कपड्यांसंदर्भातील टिप्स-

1. कपड्यांचा आकार आणि आरामदायीपणा महत्त्वाचा 
तुम्ही कोणतेही कपडे परिधान करताना त्यांचा आकार महत्त्वाचा असतो. शिवाय ते घातल्यावर तुम्ही किती कम्फर्टेबल असता ते महत्त्वाचे असते. त्यासाठीच परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. चांगले फिटिंग असलेल्या कपड्यांमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. मात्र कपडे जर गरजेपेक्षा जास्त घट्ट असतील तर ते  तुम्हाला अस्वस्थ करतात. त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा, जे परिधान करून तुम्ही आरामात बसून काम करू शकता. तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार कपडे परिधान केल्याने तुम्ही आरामदायी आणि आत्मविश्वासपूर्ण असे दोन्ही राहता. चालणारा प्रत्येक ट्रेंड तुम्ही वापरलाच पाहिजे असे नाही. कारण प्रत्येकच फॅशन आपल्याला शोभते असे नाही. 

अधिक वाचा - Math Teacher Dance Video: बाईंचा डान्स पाहून गुरुजींना घालता येईना आवर, ठुमके पाहून फुटेल हसू

2. कॅज्युअल वेअर घालू नका
शेवटी ऑफिस हे ऑफिस असते. त्यामुळे तिथे तुमचा कामाबद्दल गंभीरपणा दिसला पाहिजे. ऑफिसमधला कॅज्युअल लूकमुळे तुम्ही कामासंदर्भात गंभीर नसल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे कधीतरी एखाद्या दिवशी असे कपडे घालण्यास हरकत नाही. मात्र नेहमी कॅज्युअल वेअर्समध्ये ऑफिसला जाणे चुकीचे ठरेल. 

3. तुमच्या बुट, चपलांवर लक्ष द्या 
अनेकदा आपल्या सर्वांचे बहुतांश लक्ष कपड्यांवरच असते. पादत्राणे निवडताना, ब्रँड आणि गुणवत्तेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. यामुळे पुरेसा प्रभाव पडत नाही. जी खूप वाईट सवय आहे. कपड्यांमध्ये आरामदायी असणं हे पादत्राणाइतकंच महत्त्वाचं आहे. एका अभ्यासानुसार तर आधी लोक प्रथम तुमच्या पादत्राणांकडे लक्ष देतात. कपड्यांकडे नंतर लक्ष जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. सहसा कपड्यांशी सहज जुळणारे उत्तम दर्जाचे पादत्राणे खरेदी करा. यातून चांगला प्रभाव पडतो.

अधिक वाचा - Police saved life: चालत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पोलिसाने वाचवलं मृत्यूच्या दाढेतून, पाहा VIDEO

4. तुमच्या कपड्यातून तुमचा आत्मविश्वास दिसतो 
चांगले आणि आरामदायी कपडे घातल्यास आपला आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर आत्मविश्वास असलेली व्यक्ती नेहमीच लोकांना आकर्षित करते. म्हणूनच ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा जे परिधान करून तुमचा आत्मविश्वास वाढेल. मग ते जीन्स-शर्ट, सूट किंवा साडी असो. रंग किंवा कपड्याच्या गुणवत्तेबाबत तुमची कोणत्याही प्रकारची विशेष निवड असेल तर त्याला प्राधान्य द्या. कारण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. शेवटी कुठेतरी आत्मविश्वासाचा तुमच्या कामावरही परिणाम होतो.

चला मग ऑफिसमध्ये झक्कास इम्प्रेशन पाडायला सज्ज होऊया.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी