Vastu Tips: मुले अभ्यास करत नसतील तर वापरा हे वास्तुशास्त्राचे नियम

Vastushastra : पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याबद्दल आणि संगोपनाबद्दल चिंता असते. मुले जेव्हा अभ्यास करत नाहीत तेव्हा त्यामागे अनेक कारणे असतात हे पालकांच्या लक्षात येत नाही. मुलांची खोली किंवा जिथे ते अभ्यास करतात तेथील वास्तु जर अयोग्य असेल तर त्यांचे लक्ष अभ्यासात (Concentration in study)लागत नाही. बऱ्याचवेळा मुले अभ्यास करत नाहीत. त्यामुळे साहजिकच पालकांना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते.

Vastu tips
वास्तु टिप्स 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्राचे भारतीय परंपरेत मोठे महत्त्व
  • वास्तुशास्त्राचे नियम वापरून अनेक समस्या सोडवल्या जातात
  • लहान मुलांशी निगडीत समस्यांचे निराकारण

Vastu Tips: नवी  दिल्ली : वास्तुशास्त्राचे महत्त्व भारतीय परंपरेत आहे. दैनंदिन आयुष्यातील अनेक समस्यांचे निराकारण याद्वारे करण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचवेळा मुले अभ्यास करत नाहीत. त्यामुळे साहजिकच पालकांना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते. अलीकडच्या काळात तर पालक मुलांच्या भविष्यातील नियोजनासंदर्भात अधिक जागरुक असतात. घरातील ऊर्जा हा वास्तुशास्त्रातील (Vastushastra) एक महत्त्वाचा मुद्दा असतो. असे मानले जाते की घरातील सर्वात सकारात्मक उर्जेचे केंद्र म्हणजे मुलांची खोली (Child room). पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याबद्दल आणि संगोपनाबद्दल चिंता असते. मुले जेव्हा अभ्यास करत नाहीत तेव्हा त्यामागे अनेक कारणे असतात हे पालकांच्या लक्षात येत नाही. मुलांची खोली किंवा जिथे ते अभ्यास करतात तेथील वास्तु जर अयोग्य असेल तर त्यांचे लक्ष अभ्यासात (Concentration in study)लागत नाही. त्यामुळे अनेकवेळा ते तणावाखाली राहतात, कष्ट करूनही यश मिळत नाही. अशा वेळी वास्तुशास्त्राचे काही उपाय मुलांच्या करिअरसाठी प्रभावी ठरू शकतात. त्यासंदर्भात विस्ताराने जाणून घेऊया. (Use these Vastu tips to for children room for good results)

अधिक वाचा : Chandra Grahan 2022: 15 दिवसांत होणार दुसरे ग्रहण! वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा असा होईल परिणाम

मुलांच्या बेडरूमची दिशा

घर बांधताना हे लक्षात घेतले पाहिजे की मुलींची खोली ही ईशान्य दिशेला असावी. ही दिशा बुद्धिमत्ता आणि शक्तीशी संबंधित आहे असे मानले जाते. लहान मुलांचे पलंगही याच दिशेने ठेवावे. या दिशेमुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि त्यांना अभ्यास करावासा वाटतो.

अधिक वाचा : Chanakya Niti: साध्या आणि प्रामाणिक पुरुषांना स्त्रिया का मानतात मूर्ख? कारण जाणून बसेल धक्का

खोलीचा हलका रंग

मुलांच्या खोलीचा रंगदेखील महत्त्वाचा असतो. वास्तूनुसार मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत नेहमी फिक्या रंगाचा रंग लावावा. तो गडद नसावा. फिकट पिवळा, फिकट गुलाबी किंवा फिकट हिरवा रंग मुलांसाठी योग्य ठरतो आणि त्यांची एकाग्रता वाढते. गडद रंगामुळे मुलांचे मन विचलित होते. 

अभ्यासाचे टेबल

मुलांच्या खोलीतील त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे अभ्यासाचे टेबल. त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे टेबल पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवा. टेबल शक्यतो चौरस किंवा आयताकृती आकारात अभ्यास टेबल खरेदी करा. टेबलच्या रंगाचा मुलांच्या एकाग्रतेवरही परिणाम होतो. टेबलाचा रंग फिकट असावा.

अधिक वाचा :  नोव्हेंबर 2022 मध्ये चमकणार 4 राशींचे नशीब

मेणबत्ती असावी

मुलांच्या खोलीत मेणबत्ती असावी. त्यांच्या खोलीमध्ये मेणबत्त्या लावल्याने त्यांचे लक्ष अभ्यासावर लागते आणि मनाची एकाग्रता वाढते असे मानले जाते. मेणबत्ती मुलांच्या खोलीच्या पूर्व, ईशान्य किंवा दक्षिण भागात ठेवा. याचा मुलांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. 

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी