Vastu Tips for Negative Energy: नकारात्मक ऊर्जेमुळे घरात निर्माण होतात समस्या, वापरा या वास्तुशास्त्राच्या टिप्स

Vastushastra : घरात आनंद राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जा असणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा असे वाटते की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि त्याचा आपल्या कुटुंबावर परिणाम होत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. यासाठीच वास्तुशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. वास्तुशास्त्रामध्ये घराला नेहमी नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवले पाहिजे असे सांगितले आहे.

Vastu tips
वास्तु टिप्स 
थोडं पण कामाचं
  • घरात आनंद राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जा असणे आवश्यक
  • नकारात्मक ऊर्जेचा आपल्या कुटुंबावर परिणाम होत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते
  • वास्तुशास्त्रात यावर काही उपाय आहेत

Vastu Tips to remove Negative Energy:नवी दिल्ली : आपल्या घरातील वातावरण आणि ऊर्जा यांचा आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबियांवर मोठा परिणाम होत असतो. घरात आनंद राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जा (Positive energy) असणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा असे वाटते की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा (Negative Energy)आहे आणि त्याचा आपल्या कुटुंबावर परिणाम होत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. यासाठीच वास्तुशास्त्रात (Vastushastra) काही उपाय देण्यात आले आहेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. वास्तुशास्त्रामध्ये घराला नेहमी नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवले पाहिजे असे सांगितले आहे. या नकारात्मक ऊर्जेमुळे एखाद्या व्यक्तीला आर्थिक, आरोग्य किंवा वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्त्रात यावर उपाय सांगितले आहेत यामुळे आपला फायदा होतो. (Use these Vastu tips to remove negative energy from home)

अधिक वाचा - Business Ideas: पुष्पा चित्रपटाच्या लाल चंदनासारखा पैसा आहे या व्यवसायात...आयुष्यभर कमाईच कमाई

घरात ताजी फुले ठेवा

घरात कोमेजलेली फुले कधीही ठेवू नयेत असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. कोमेजलेली फुले असल्यास नकारात्मक शक्ती राहतात. परिणामी त्या व्यक्तीला आर्थिक आणि आरोग्याच्या आघाडीवर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठीच घरात ताजी फुले ठेवली पाहिजेत. असे मानले जाते की घरात बहरलेली फुले लावल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो.

अधिक वाचा - Stomach Bloating in winter: थंडीत पोट फुगण्याची मोठी समस्या, किचनमधील या गोष्टींनी मिळेल दिलासा

सूर्यप्रकाशाचा प्रभाव 

सूर्यप्रकाश हा जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. घराच्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाचा घरावर प्रभाव पडतो. त्यामुळे घरातील वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न असले पाहिजे. आपण दिवसातून दोनदा सूर्यप्रकाश वापरला पाहिजे. कारण सुगंधी आणि शुद्ध वातावरणामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो. परिणामी घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. 

अधिक वाचा - पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खुर्चीत बसल्या बसल्या करायचे सोपे व्यायामप्रकार

ही युक्ती वापरा

खोलीत मीठ शिंपडल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे वास्तुशास्त्रात मानले जाते. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असल्यामुळे याचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर पाण्यात लिंबू, व्हिनेगर आणि थोडासा बेकिंग सोडा मिसळून घराची साफसफाई केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत घरातील समस्या संपण्यात मदत होते.  

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्या आधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी