मुंबई:पावसाळ्याच्या(Monsoon) दिवसांत ओले कपडे(wet clothes) कसे सुकवावेत ही मोठी समस्या असते. मात्र जरी कपडे सुकले तरी त्यातून एक प्रकारचा दुर्गंध(smell) येतो. अशातच हे कपडे सुकवणे तसेच त्याचा दुर्गंध घालवणे हे एक मोठे आव्हान असते. याशिवाय कपड्यांना बुरशी लागण्याचीही भीती असते. त्यामुळे कपडे खराब होऊ शकतात. सोबतच ते त्वचेसाठीही हानिकारक असते. ओले कपडे घातल्याने खाजेची समस्या येऊ शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगत आहेत कपडे सुकवण्याचे तसेच त्यातून दुर्गंध घालवण्याचे काही उपाय (Use this tips for dry clothing)
अधिक वाचा - ५ वर्षांपूर्वी खाल्लेलं सँडविच पडलं महागात, आजही सोडतोय गॅस
पावसाळ्यात बाल्कनी तसेच छतावर कपडे सुकवणे शक्य नसते. अशातच तुम्ह कपडे हँगरला लावून पंख्याच्या खाली सुकवू शकता. तुम्ही जर पंख्यासोबत हीटरही सुरू केला तर कपडे लवकर सुकतील.
कपड्यांचा दुर्गंध घालवण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी एका बादलीत लिंबू पिळून घ्या सोबच यात बेकिंग सोडाही टाका. त्यानंतर या मिश्रणात कपड पिळून सुकवा. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही. ॉ
पावसाळ्याच्या दिवसांत कपडे सुकवणे हे सगळ्यात मोठे आव्हान असते. अशातच कपड्यांबाबत काही सावधानता बाळगल्या पाहिजेत. जसेच एकत्र खूप कपडे भिजवू नका. तसेच कपड्यांना खूप वेळ भिजवून ठेवू नका. याशिवाय चांगल्या डिटर्जंट पावडरचा वापर करा.यामुळे कपड्यांचा दुर्गंध दूर होईल तसेच कपडे सुकवण्याची समस्याही कमी होईल.
पावसाळ्यात जेव्हा कपडे सुकवण्याची गोष्ट येते तेव्हा या स्टँडचा वापर फायदेशीर ठरतो. तुम्ही धुतलेले कपडे यावर सुकत घालून हे स्टँड पंख्याखाली ठेवले तर कपडे लवकर सुकतात.
अधिक वाचा - घरातून निघालेली तरुणी परतलीचं नाही, नंतर जे घडलं ते.....
जर तुमच्या घरात हेअर ड्रायर आहे आणि तुम्हाला बाहेर जायचे आहे आणि कपडे लवकर सुकवायचेत तर तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता. पावसाळ्याच्या दिवसांत तुम्ही कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू शकता.