Rose Day Facts: ‘या’ गुलाबाची किंमत आहे कोट्यवधी रुपये, जाणून घ्या काय आहे स्पेशल

लाइफफंडा
Updated Feb 07, 2020 | 14:44 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Why Rose Day is Celebrated, Most Expensive Rose: व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाच्या फुलांना खूप मागणी असते. जगातील सर्वात महागड्या गुलाबाच्या फुलांबद्दल आपल्याला माहितीय, जाणून घ्या याबाबत...

Juliet Rose
‘या’ गुलाबाची किंमत आहे कोट्यवधी रुपये,जाणून घ्या स्पेशालिटी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस आहे रोझ डे
  • जगातील सर्वात महागडा गुलाब आहे ज्युलिएट रोझ
  • काळ्या रंगाचा गुलाब नसतो, सोशल मीडियावर व्हायरल फोटो एडिटेड

Rose Day: व्हॅलेंटाईन वीक म्हणजे रोमांसचा आठवडा आणि या आठवड्याचा पहिला दिवस असतो रोझ डे. या दिवशी प्रेम असो किंवा मैत्री प्रत्येक भावना ही वेगवेगळ्या रंगाचा गुलाब देऊन व्यक्त केली जाते. प्रेम दर्शविण्यासाठी लाल रंगाचा गुलाब दिला जातो. तर मैत्रीची नवीन सुरूवात करण्यासाठी पिवळा गुलाब देतात. जर पहिल्या नजरेचं प्रेम असेल तर लव्हेंडर रंगाचा गुलाब प्रेमवीर देतात.

लाल गुलाब कसं बनलं प्रेमाचं प्रतिक

खरंतर प्रत्येक रंगाच्या गुलाबाचा काही न काही अर्थ असतो. मात्र गुलाबालाच प्रेमाचं प्रतिक का मानलं जातं हा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर जाणून घ्या, १४ व्या शतकानंतर जेव्हा रोमच्या सेंट व्हॅलेंटाईनच्या नावावरून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जावू लागला, तेव्हापासूनच लाल गुलाब त्यांच्या आवडीमुळे पॉप्युलर झालाय.

तर कवी आणि लेखक असलेल्या विल्यियम शेक्सपिअरनं आपल्या काव्यांमध्ये आणि नाटकांमध्ये लाल गुलाबाला प्रेम आणि कुणासाठी असलेलं आकर्षण आणि रोमांसचं प्रतिक बनवलं. त्यांच्या एका कथेमध्ये क्लियोपेट्रोच्या महाराणीनं आपल्या प्रियकराचं प्रेम मिळविण्यासाठी लाल गुलाबाचं कार्पेट बनवलं होतं.

‘हा’ आहे कोट्यवधींचा गुलाब

जगातील सर्वात महागडा गुलाब आहे ज्युलिएट रोझ (Juliet Rose). इंटरनेटवर असलेल्या माहितीनुसार याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. कारण एका फ्लॉवर एक्सपर्टनं अनेक प्रकारचे गुलाब मिसळून हा गुलाब तयार केलाय.

 

 

काळा गुलाब कधीही नसतो

सोशल मीडियावर काळा गुलाब खूप चर्चेत असतो. मात्र या रंगाचा कुठलाही गुलाब कधीही नसतो किंवा नाहीय. त्यामुळे काळा गुलाबाचे जे फोटो सोशल मीडियावर असतात ते सर्व एडिट केलेले असतात.

गाण्यात पॉप्युलर असतो गुलाब

गुलाबाचं फुल सर्वांनाच आवडतं. जगभरात गुलाब या विषयावर आतापर्यंत जवळपास ४ हजार गाणी बनलेली आहेत. यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की, गुलाब किती लोकप्रिय आहे ते.

तर मग यंदाच्या व्हलेंटाईन विकमध्ये आपला आवडता गुलाब निवडून प्रिय व्यक्तीला नक्की द्या.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी