Happy Valentine Day 2023 Shayari in Marathi: व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शायरी

Happy Valentine Day 2023 Shayari in Marathi : व्हेलेंटाईन डेचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवणार असाल तर ही काही रोमॅन्टिक ग्रिटिंग्स, मेसेजेस,GIF Images आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक स्टेटस नक्की शेअर करा

valentines day 2023 marathi Shayari wishes images whatsapp status facebook post greetings to share your feelings with your partner
व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शायरी 
थोडं पण कामाचं
  • 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात 'वेलेंटाईन  डे' (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो.
  • फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा तरूणाईसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी खास असतो.
  • यादिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीजवळ प्रेमची कबुली दिली जाते, नात्यामधील विश्वास, आदर खास या दिवशी विविध माध्यमातून व्यक्त केला जातो.

 Happy Valentine Day 2023 Shayari in Marathi: 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात 'वेलेंटाईन  डे' (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा तरूणाईसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी खास असतो. यादिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीजवळ प्रेमची कबुली दिली जाते, नात्यामधील विश्वास, आदर खास या दिवशी विविध माध्यमातून व्यक्त केला जातो. मग हे नातं केवळ प्रियकर आणि प्रेयसी यांच्यापुरता मर्यादीत नसतं. प्रेमाचा केवळ एकच दिवस का असावा? यावर अनेक मतमतांतर आहेत. पण आयुष्य कधीच केवळ लव्ही-डव्ही नसतं, त्यामध्ये चढ-उतार, रूसवे फुगवे असतात. 364 दिवस तुम्ही प्रेम करत असलात तरीही एक दिवस त्या प्रेमाची कबुली देणंही गरजेचे आहे. मग यंदा वेलेंटाईन  डेचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवणार असाल तर ही काही रोमॅन्टिक ग्रिटिंग्स (Romantic Greetings), मेसेजेस (Messages),GIF Images आणि व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp Status), फेसबूक स्टेटस (Facebook Status) शेअर करुन पहा तुमच्या प्रेमाला समोरच्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळतोय का?

व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शायरी

चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील तो प्रेमाचा पारवा..
ह्या नशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हाती हवा…
Happy Valentine Day My Sweetheart!!!

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडत,
तसचं काही पाउल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येत…

valentine day 2023 marathi Shayari

तुझ्याविना मी कधी नसतोच,
आठवणीचे ओंजळ घेऊन
एकांतातही तू असतोच..

तुला पाहून मन माझं
गगन झुल्यात झुलतं कारण
आख्ख आसमंत तेव्हा तुझ्या नयनात फुलत..

valentine day 2023 marathi Shayari 3


शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम..

valentine day 2023 marathi Shayari 1
आज वारा वाहतोय त्या माळरोपाच्या लयीत, आणि
आता तुझंच नाव येतय
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत…

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे..
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे.

valentine day 2023 marathi Shayari 2

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण

valentine day 2023 marathi Shayari 4

दिवसा मागून दिवस गेले उत्तर तुझे कळेना,
आजच्या या प्रेम दिवशी संपव माझ्या वेदना..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी