वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला योग्य वस्तू असल्यास होईल लाभ

Vastu Direction For Home Sleeping Study Mandir Store Room In Marathi : वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला योग्य वस्तू असल्यास त्या घरात राहणाऱ्यांना लाभ होतो. जर तसे नसेल तर संबंधित घरात राहणाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो असे म्हणतात.

Vastu Direction For Home Sleeping Study Mandir Store Room In Marathi
वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला योग्य वस्तू असल्यास होईल लाभ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला योग्य वस्तू असल्यास होईल लाभ
  • वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला योग्य वस्तू नसल्यास घरात राहणाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो
  • नवे घर बांधताना अथवा घराचे इंटेरिअर करताना वास्तूतज्ज्ञाचा सल्ला घेणे हिताचे

Vastu Direction For Home Sleeping Study Mandir Store Room In Marathi : वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला योग्य वस्तू असल्यास त्या घरात राहणाऱ्यांना लाभ होतो. जर तसे नसेल तर संबंधित घरात राहणाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो असे म्हणतात. यामुळेच ज्यांचा वास्तूशास्त्रावर विश्वास आहे अशी मंडळी वास्तूतज्ज्ञ बोलावून त्याच्या मार्गदर्शनानुसार घराची रचना आणि घराची सजावट करण्याचे नियोजन करतात. वास्तूशास्त्राचा सुयोग्य वापर झाल्यास घरात सुखसमृद्धी येते असे म्हणतात. यामुळे नवे घर बांधताना अथवा घराचे इंटेरिअर (घराची अंतर्गत रचना आणि सजावट) करताना अनेकजण वास्तूतज्ज्ञाचा सल्ला घेण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. । वास्तुशास्त्र

Artificial Flowers: घरात आर्टिफिशियल फूल ठेवणे योग्य असते का? जाणून घ्या

योग्य दिशा आणि शांत झोप

घरात झोपण्याच्या वेळी झोपणाऱ्याचे डोके पूर्व अथवा दक्षिण दिशेला आणि पाय पश्चिम अथवा उत्तर दिशेला असावेत असा सल्ला वास्तूतज्ज्ञ देतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा माणसावर परिणाम होतो. डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला अशी स्थितीत असल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते, असे वास्तूशास्त्र सांगते. यामुळे वास्तूशास्त्रावर विश्वास असलेले झोपण्याच्या खोलीची रचना तशाच पद्धतीने करण्यावर भर देतात. अविवाहीत मुलींची झोपण्याची खोली उत्तर-पश्चिम दिशेला असेल तर त्यांचे लग्नात अडचणी येत नाहीत आणि आल्या तर त्या लवकर दूर होतात, असे वास्तूशास्त्र सांगते.

घराच्या भिंतीशी संबंधित 'या' 4 चुकांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होईल बराच फायदा

उत्तर दिशा आणि आर्थिक गणित

वास्तूशास्त्रात उत्तर दिशेला कुबेराचे स्थान असे म्हटले आहे. यामुळे जेव्हा आर्थिक मुद्यांवर चर्चा करायची असते त्यावेळी नेहमी समोर उत्तर दिशेला बघता येईल अशा पद्धतीने बसावे आणि आपल्या उजव्या हाताशी चेक, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे ठेवावी. चर्चा शांतपणे करावी. समोरच्याचे बोलणे शांतपणे आणि पूर्ण ऐकून नंतर प्रतिक्रिया द्यावी. आवश्यकता नसताना बोलू नये. मुद्देसूद बोलावे. कोणत्याही कागदावर सही करताना तो आधी वाचून आणि समजून घ्यावा. यामुळे फसवणूक टळते. आर्थिक फायदा होण्यास मदत होते. उत्तरेकडील चुंबकीय ऊर्जा थेट मेंदूतील पेशींपर्यंत पोहोचते आणि मेंदू सक्रीय होतो.

Vastu Tips For Mirror: घरातील आरसा बदलू शकतो तुमचे नशीब; असा आरसा लावल्यास वाढेल डोकेदुखी

निरोगी जीवन

वास्तूशास्त्रानुसार पूर्वेकडे तोंड करून जेवण करावे. यामुळे आरोग्य उत्तम राहते. निरोगी दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते. आर्थिक अडचणी येत असतील आणि आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न सुरू असूनही अपेक्षित यश मिळत नसेल तर पश्चिमेकडे तोंड करून जेवण करावे. पण दक्षिणेकडे तोंड करून जेवण करणे टाळावे. उत्तरेकडे तोंड करून जेवल्यास पोटाचे विकार होण्याचा धोका वाढतो. स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड पूर्वेकडे असावे. गृहिणीचे तोंड दक्षिणेकडे असल्यास हाडांचे त्रास, त्वचाविकार होण्याचा धोका असतो. स्वयंपाकघरात पाणी ईशान्य दिशेला आणि गॅस सिलेंडर, चूल वा शेगडीची व्यवस्था आग्नेय दिशेला असणे लाभदायी ठरते.

रोगप्रतिकारक क्षमता

वास्तूशास्त्रानुसार बोरिंगचे पाणी अर्थात जमिनखालून येणाऱ्या पाण्याची व्यवस्था महत्त्वाची आहे. जर हे पाणी उत्तरेकडून अथवा उत्तर-पूर्व दिशेतून येत असेल तर संबंधित घरात आर्थिक संपन्नता राहते. घरात जन्माला येणारे बाळा निरोगी आणि सुंदर असते. घरात राहणाऱ्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. 

भाडेकरू

वास्तूशास्त्रानुसार घर मालक अथवा कुटुंबप्रमुख असलेल्या व्यक्तीने घरात नैऋत्य दिशेला अर्थात दक्षिण-पश्चिम भागातील खोलीत वास्तव्य करावे आणि भाडेकरूला वायव्य दिशेच्या अर्थात उत्तर-पश्चिम दिशेच्या खोलीत राहण्याची परवानगी द्यावी. 

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी