घराच्या भिंतीशी संबंधित 'या' 4 चुकांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होईल बराच फायदा

Vastu tips for House Wall:वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो.

vastu tips
vastu tips for house wall 
थोडं पण कामाचं
  • वास्तूमध्ये घराच्या भिंतींबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
  • आपल्या घरावर आणि जीवनावरही ग्रहांचा शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो.
  • घरातल्या वास्तुदोषाचा प्रभाव तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही बिघडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: Vastu tips for House Wall: प्रत्येकाला स्वतःच्या घरात सुख-शांती, समृद्धी नांदावी, असं वाटतं असतं. त्यासाठी काही जण विशिष्ट पद्धतीनं घराची बांधणी करतात, तसंच घराची सजावट करणं अशा गोष्टी करत असतात. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. घरातल्या वास्तुदोषाचा प्रभाव तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही बिघडण्याची शक्यता आहे. 

आपल्या घरावर आणि जीवनावरही ग्रहांचा शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो. वास्तूमध्ये घराच्या भिंतींबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर घराच्या भिंती सुरक्षित नसतील तर ग्रहांचा अशुभ प्रभाव पडतो, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्य आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं.

भिंतींच्या या चुकांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

  1. तुमच्या घराच्या भिंतीला कोणत्याही प्रकारची तडा असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. राहुचा प्रभाव घरातील भेगा आणि भिंतींवर राहतो असं म्हटलं जातं. भिंतीला तडा गेली असेल तर पैशांची हानी होऊ शकते. विशेषत: उत्तर दिशेला कोणत्याही भिंतीला तडा गेलेली नसावी. हे कुटुंबात वाद होण्याचे संकेत दर्शवतात. 
  2. वास्तूनुसार ज्या घरात अनेकदा ओलसरपणा असतो, तिथे लक्ष्मी माता असित्त्व राहत नाही. असं मानलं जातं की, ओलसरपणामुळे पाणी ज्या प्रकारे वाहते, त्याच प्रकारे पैसा कधीही आपल्या हातात राहू शकत नाही.
  3. भिंती वेळोवेळी स्वच्छ केल्या पाहिजेत, कारण धूळ आणि मातीनं भरलेल्या घाणेरड्या भिंती नकारात्मक उर्जेला आमंत्रण देत असतात. घराच्या कानाकोपऱ्यात कोळ्याचे जाळं असल्यानं जीवन तणावपूर्ण आणि उदासीन बनून जातं. 
  4. घराच्या भिंतींचा रंगही वास्तुशी संबंधित असतो. घरामध्ये उत्तम आरोग्य आणि सुख-शांती राहण्यासाठी भिंतींवर हलके रंग वापरावेत.


Disclaimer: येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की timesnowmarathi.com कोणत्याही प्रकारच्या विश्वासाला, माहितीला दुजोरा देत नाही. कोणतीही माहिती किंवा गृहितक लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी