Vastu Tips: तुमच्या घरात पाल फिरते का? मग तुम्हाला मिळू शकते आनंदाची बातमी

Astrology : काय केले पाहिजे, काय टाळले पाहिजे यासंदर्भातील मार्गदर्शन वास्तुशास्त्रात (Astrology) केले आहे. त्याच प्रकारचे मार्गदर्शन ज्योतिषशास्त्रातदेखील करण्यात आलेले आहे. साधारणपणे आपण घरातील पाली हाकलून लावतो किंवा ते दिसताच मारतो. परंतु ज्योतिषशास्त्रात यासंदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रात पालीला (Lizard) शुभ मानले गेले आहे.

Vastu tips
वास्तु टिप्स 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशासत्रात घरातील अनेक गोष्टींचे मार्गदर्शन
  • घरात पाल असल्यास अनेकांना आवडत नाही
  • मात्र पाल असल्याचे शुभ संकेत असल्याची मान्यता

Vastu Tips For Lizard : नवी दिल्ली : वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra)घर आणि घरातील अनेक गोष्टींचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे यासंदर्भात काय केले पाहिजे, काय टाळले पाहिजे यासंदर्भातील मार्गदर्शन वास्तुशास्त्रात (Astrology) केले आहे. त्याच प्रकारचे मार्गदर्शन ज्योतिषशास्त्रातदेखील करण्यात आलेले आहे. साधारणपणे आपण घरातील पाली हाकलून लावतो किंवा ते दिसताच मारतो. परंतु ज्योतिषशास्त्रात यासंदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आले आहे.  ज्योतिषशास्त्रात पालीला (Lizard) शुभ मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाली दिसणे हे वेगवेगळ्या चांगल्या बातम्या घेऊन येते. यासंदर्भातील काही गोष्टी जाणून घ्या. (Vastu Tips for Lizards in house)

अधिक वाचा - PM Narendra Modi : मी दररोज दोन ते तीन किलो शिव्या खातो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तेलंगाणात वक्तव्य

सकाळी घरात पाल दिसणे (Lizard Vastu Tips)

ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांच्या मते, घरामध्ये पाल असणे हे शुभ लक्षण आहे. यासंदर्भात सांगितले जाते की एकीकडे पाल माश्या-डास आणि इतर कीटक खाऊन घरातील घाण काढून टाकते. त्याचबरोबर दुसरीकडे त्याचे दिसणे पैशाच्या आगमनाचे संकेत देते. त्यामुळे पालीसंदर्भात शुभ मानले जाते.

सकाळी उठल्याबरोबर घरात पाल दिसल्यास त्याचा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ काही मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे असे मानले जाते. जर सकाळी घराच्या फरशीवर पाल फिरताना दिसली तर नक्कीच उत्पन्नाच्या स्रोतात वाढ होते. उत्पन्नदेखील वाढते असे मानले जाते. 

अधिक वाचा - Two planes collide: हवेत दोन विमानांची टक्कर, एअर शोदरम्यान घडला अपघात, Watch Video

घरातील पूजास्थान किंवा देव्हाऱ्यात पाल असणे

घरातील पूजास्थान किंवा देव्हाऱ्यात पाल असणे याला लक्ष्मीशी जोडण्यात आले आहे. देव्हाऱ्यात पाल असणे म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. घराच्या विविध कोपऱ्यात किंवा विविध भागात पाल दिसते मात्र ती पूजेच्या ठिकाणी दिसत नाही, हेही तुम्ही लक्षात घेतले असेल. जिथे पूजेच्या खोलीत पाल असते तिथे लक्ष्मीचा वास असल्याचे म्हटले जाते. त्या घरात संपत्ती प्राप्ती होते अशी मान्यता आहे. त्यामुळे पूजास्थानातील पाल हाकलू नये असे सांगितले जाते. 

दिवाळीच्या रात्री पाल दिसणे

दिवाळीच्या रात्री पाल दिसत नाही. मात्र जर त्या दिवशी पाल दिसली तर नशीब उजळते. येणारा काळ त्या व्यक्तीसाठी अनेक प्रकारच्या आनंदाची बातमी घेऊन येतो. त्याची प्रगती होते आणि सुख समृद्धी होते.

अधिक वाचा - Beautiful Skin Tips : सुंदर त्वचेसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा या गोष्टी...

पाल अंगावर पडण्याचा वेगळा अर्थ 

पालीबद्दल सहसा चांगले बोलले जात नाही. किंबहुना पालीची सर्वसाधारणपणे शिसारीच येते. पालीला पाहून अनेकजण घाबरतात. पाल अंगावर पडली तर काय  होईल? तर याला ज्या सरड्याला पाहून लोक घाबरतात, तोच सरडा माणसाच्या अंगावर पडला तर काय होईल? यासंदर्भात सांगण्यात आले आहे की एखाद्या व्यक्तीच्या अंगावर किंवा डोक्यावर पाल पडल्यास त्याच्या नशीबात राजयोग असतो. त्याला प्रत्येक कामात यश मिळते.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी