Vastu Plant: आर्थिक अडचणी आणि शनिदोषातून सुटकेसाठी घरात 'येथे' ठेवा विष्णूचे आवडते झाड

vastu tips for plant, keep vishnu dev or lord vishnu favourite plant aprajita to get rid of money problems and shani dosh : वास्तुतज्ज्ञ हा तुमच्या अवतीभोवती जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेची निर्मिती व्हावी यासाठी काय करायचे ते सांगतो.

vastu tips for plant, keep vishnu dev or lord vishnu favourite plant aprajita to get rid of money problems and shani dosh
Vastu Plant: आर्थिक अडचणी आणि शनिदोषातून सुटकेसाठी घरात 'येथे' ठेवा विष्णूचे आवडते झाड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Vastu Plant: आर्थिक अडचणी आणि शनिदोषातून सुटकेसाठी घरात 'येथे' ठेवा विष्णूचे आवडते झाड
  • वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेत आणि प्रत्येक वस्तूत ऊर्जा
  • सकारात्मक ऊर्जा फायद्याची तर नकारात्मक ऊर्जा त्रासदायक

vastu tips for plant, keep vishnu dev or lord vishnu favourite plant aprajita to get rid of money problems and shani dosh : वास्तुशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणता येईल. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेत आणि प्रत्येक वस्तूत ऊर्जा असते. ही ऊर्जा सकारात्मक असेल तर तिथे राहणाऱ्यास लाभ होईल आणि नकारात्मक असेल तर तिथे राहणाऱ्यास त्रास होईल. वास्तुतज्ज्ञ हा तुमच्या अवतीभोवती जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेची निर्मिती व्हावी यासाठी काय करायचे ते सांगतो. नवे घर बांधताना अथवा घराचे इंटेरिअर (घराची अंतर्गत रचना आणि सजावट) करताना वास्तुशास्त्र जाणणाऱ्या तज्ज्ञाची अर्थात वास्तुतज्ज्ञाची मदत घेणे हिताचे ठरू शकते. । वास्तुशास्त्र

Artificial Flowers: घरात आर्टिफिशियल फूल ठेवणे योग्य असते का? जाणून घ्या

एखाद्या व्यक्तीला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर त्या व्यक्तीने विष्णू देवाला प्रसन्न करण्यासाठी ठोस उपाय करणे आवश्यक आहे. याकरिता अनेक वास्तुतज्ज्ञ अपराजिता फुलाची वेल कुंडीत लावून ती कुंडी घरात उत्तर दिशेला ठेवण्याचा सल्ला देतात. विष्णू देवाला प्रसन्न करणाऱ्या झाडांमध्ये अपराजिता फुलांच्या वेलाचा समावेश होतो. यामुळेच विष्णू देवाला प्रसन्न करण्यासाठी घरात उत्तर दिशेला अपराजिताचे वेल लावण्याचा सल्ला वास्तुतज्ज्ञ देतात. हे वेल चुकूनही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नका, नाहीतर कुटुंबप्रमुखाला त्रास होतो.

घराच्या भिंतीशी संबंधित 'या' 4 चुकांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होईल बराच फायदा

कोणत्याही वर्षाच्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान विष्णू देवाला आवडणाऱ्या अपराजिता फुलांच्या वेलीची कुंडी घरात उत्तर दिशेला ठेवावी. यानंतर दररोज घर स्वच्छ ठेवावे. घरात भांडू नये. देवाची मनोभावे पूजा करावी. दररोज वेलीला थोडे पाणी घालावे आणि ती वेल  व्यवस्थित वाढेल याची खबरदारी घ्यावी. घरात कोणतेही व्यसन करू नये तसेच घरात चुकीचे वर्तन करू नये. यामुळे विष्णू देव संबंधित घरावर प्रसन्न होतो आणि त्याची कृपादष्टी सदैव संबंधित घरावर राहते, असे म्हणतात.

Vastu Tips For Mirror: घरातील आरसा बदलू शकतो तुमचे नशीब; असा आरसा लावल्यास वाढेल डोकेदुखी

असे सांगतात की अपराजिताची वेल जशी वाढते तशी घरात सुखसमृद्धी नांदण्यास सुरुवात होते. यामुळेच अपराजिताचे व्यवस्थित संगोपन करावे. असेही सांगतात की अपराजिता हे फूल विष्णू देवाला तसेच भगवान विष्णुचा अवतार समजल्या जाणाऱ्या कृष्ण देवाला प्रसन्न करते. शनि दोष, साडेसाती, शनिची ढय्या अशा समस्या दूर करण्यासाठी अपराजिता सहाय्यक ठरते. यामुळेच अपराजिताला प्रचंड महत्त्व आहे.

मनाजोगती नोकरी मिळवण्याठी तसेच आर्थिक प्रश्न सुटावे यासाठी घरात अपराजिताची वेल उत्तर दिशेला लावावी. नोकरीसाठी दर सोमवार आणि शनिवार या दिवशी अपराजिताची तीन फुले वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. तसेच शनिच्या दोषांतून मुक्त होण्यासाठी दर शनिवारी अपराजिताची पाच फुले शनि देवाच्या चरणी अर्पण करावी. 

अपराजिताचा उपाय केला तरी संबंधित तरुणाने किंवा तरुणीने नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक ती तयारी करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा कष्ट करणाऱ्यांनाच त्याचे चांगले फळ मिळते. अपराजिताचा उपाय केला तरी कष्ट हे करावेच लागतात. अपराजिता हे कष्ट सोपे करण्यासाठी मदत करते, हाच मोठा फायदा आहे.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी