Vastu Tips: घरात जेवताना करू नका 'ही' चूक, नाहीतर व्हाल बर्बाद; आज बदला सवयी

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Sep 19, 2022 | 10:26 IST

Vastu Tips: घरात चुकीच्या दिशेला बसून जेवल्यानंही तुम्ही वास्तुदोषाचे शिकार होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला या दोषाचे परिणाम आणि ते टाळण्याचे मार्ग सांगणार आहोत.

Vastu Tips for meal
घरात जेवताना करू नका 'ही' चूक, नाहीतर व्हाल बर्बाद 
थोडं पण कामाचं
  • व्यक्तीच्या आयुष्यात वास्तुशास्त्राचं (Vastu Shastra) खूप महत्त्व आहे.
  • अनेक वेळा वास्तुदोषांमुळे (Vaastu Dosha) आपली प्रगती आणि कुटुंबातील सुख-शांती भंग पावते.
  • घरात धन (lack of money)आणि अन्न न मिळण्याचे कारणही वास्तुदोष असू शकतात.

मुंबई:  Vastu Tips: व्यक्तीच्या आयुष्यात वास्तुशास्त्राचं (Vastu Shastra) खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडत असतो.  अनेक वेळा वास्तुदोषांमुळे (Vaastu Dosha) आपली प्रगती आणि कुटुंबातील सुख-शांती भंग पावते. घरात धन (lack of money)आणि अन्न न मिळण्याचे कारणही वास्तुदोष असू शकतात. असे दोष टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vaastu Shastra)  सोपे उपाय सांगितले आहेत. घरात चुकीच्या दिशेला बसून जेवल्यानंही तुम्ही वास्तुदोषाचे शिकार होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला या दोषाचे परिणाम आणि ते टाळण्याचे मार्ग सांगणार आहोत. 

जेवताना ही चूक करू नका

वास्तूनुसार नेहमी जमिनीवर बसून जेवायला हवे. जेवताना आपले तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. याउलट कोणत्याही दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. दरम्यान जर तुम्ही जेवणाच्या टेबलावर बसून जेवत असाल तर नेहमी पूर्वेकडे तोंड ठेवा. तुमच्या कुटुंबातील लोक जेवणाच्या टेबलावर जेवण करत असतील तर ते कधीही रिकामे ठेवू नका. येथे नेहमी फळे, मिठाई किंवा खाद्यपदार्थ असावेत.

अधिक वाचा- निवडणूक निकालाचा धुरळा, राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आज मतमोजणी

घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण कसे द्यावे?

घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण देताना दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून बसवावे. अन्न खाण्यापूर्वी देव किंवा कुलदैवताला अन्न अर्पण करावं. असे केल्याने घरात अन्नपूर्णाचे वास करते. वास्तूचा हा नियम पाळणाऱ्यांच्या घरात नेहमी अन्न आणि पैशाचा साठा असतो.

अंथरुणावर बसून जेवण्याची चूक करू नका

वास्तूनुसार बेडवर बसून कधीही अन्न खाऊ नये. अशा चुका करणारे लोक जीवनातील यशाच्या मार्गापासून भरकटतात. त्यांच्या खांद्यावर नेहमीच कर्जाचे ओझे असते. या लोकांना अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आजार त्यांना नेहमीच घेरतात. ते सामान्य लोकांपेक्षा औषधांवर जास्त पैसे खर्च करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी