Vastu Tips : चुकूनही या दिशेला पाय ठेवून झोपू नका, होईल नुकसान

Vastu Tips in Marathi Know why one should not have feet towards specific direction while sleeping : वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वाढविणारे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे विशेष महत्त्व आहे.

Vastu Tips in Marathi Know why one should not have feet towards specific direction while sleeping
चुकूनही या दिशेला पाय ठेवून झोपू नका, होईल नुकसान  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चुकूनही या दिशेला पाय ठेवून झोपू नका, होईल नुकसान
  • वास्तुशास्त्रानुसार दक्षिण आणि पूर्व या दोनपैकी कोणत्याही दिशेला पाय ठेवून झोपणे हानीकारक
  • दक्षिण दिशा ही यमाची दिशा

Vastu Tips in Marathi Know why one should not have feet towards specific direction while sleeping : वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वाढविणारे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे विशेष महत्त्व आहे. कोणत्या दिशेचा कशा प्रकारे वापर झाल्यास घरात राहणाऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि कशा प्रकारे वापर झाला तर हानी होऊ शकते याविषयी वास्तुशास्त्रात मार्गदर्शन केले आहे. 

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण आणि पूर्व या दोनपैकी कोणत्याही दिशेला पाय ठेवून झोपणे हानीकारक ठरू शकते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्याचे वास्तुशास्त्र सांगते याच कारणामुळे वास्तुशास्त्र दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपणे हानीकारक असल्याचे सांगते. पूर्व दिशेला सूर्याच्या ऊर्जेचा प्रचंड प्रभाव आहे. याच कारणामुळे या ऊर्जेकडे पाय ठेवून झोपणे अयोग्य आहे, असे वास्तुशास्त्र सांगते. 

दक्षिण दिशेला पाय ठेवल्यास संबंधित व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. या उलट पूर्व दिशेला पाय ठेवले तर सकारात्मक ऊर्जेचा अपमान होतो आणि शरीरात पुरेश्या सकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही किंवा शरीरात कमी प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो असे वास्तुशास्त्र सांगते. याच कारणामुळे दक्षिण आणि पूर्व या दोनपैकी कोणत्याही दिशेला पाय ठेवून झोपणे हानीकारक असल्याचे वास्तुशास्त्र सांगते.

वास्तुशास्त्र शरीराला जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेचा लाभ व्हावा यासाठी पूर्व दिशेला डोकं आणि पश्चिम दिशेला पाय ठेवून झोपण्यास सुचवते.

या दिशेला डोके ठेवून झोपा 

  1. दक्षिण आणि उत्तर : वास्तूशास्त्रानुसार, उत्तर किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपता येते. यामुळे आरोग्य चांगले राहते. यासोबतच वयातही वाढ होते.
  2. पूर्वेकडे डोके : पूर्वेकडे डोके ठेवून झोपणे देखील चांगले मानले जाते. या दिशेला डोके ठेवून झोपल्याने एकाग्रता वाढते. यासोबतच स्मरणशक्ती जलद होते.
  3. पश्चिमेकडे डोके : पश्चिमेकडे डोके ठेवून झोपणे देखील शुभ मानले जाते. कारण या दिशेचा स्वामी वरुण देव आहे. अशा स्थितीत या दिशेला डोके ठेवून झोपल्याने आदर वाढतो.
  4. बेडची दिशा : वास्तूशास्त्रानुसार, पलंग कधीही दारासमोर नसावा. यामुळे तणावाखाली असण्यासोबतच व्यक्तीला अनेक प्रकारची वाईट स्वप्ने पडतात.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी