Vastu Tips: खराब डिझाइन केलेले बेड नवरा-बायकोच्या नात्यात आणतो दुरावा

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jan 16, 2022 | 09:07 IST

पती-पत्नीची (Husband and wife) भांडणे तुम्ही नेहमी पाहिली असतील. कुटुंबातल्या (family) सदस्यांमध्येही अधूनमधून खटके उडत असतात. ही भांडणं कधी-कधी एकमेकांच्या विचारांमध्ये असणाऱ्या फरकांमुळे होतात.

Vastu Shastra
Vastu Shastra : घरातील 10 बदल सुधारतील तुमचं नातं   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कधीही आग्नेय दिशेला दरवाजा असणाऱ्या रूममध्ये राहू नका.
  • अनावश्यक वस्तूंनी तुमची रूम भरून ठेवू नका. अन्यथा त्या रूममध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते.
  • ज्या बेडवर झोपता तो लाकडाचा असावा आणि तो चौकोनी असावा.

Vastu tips: दिल्ली : पती-पत्नीची (Husband and wife) भांडणे तुम्ही नेहमी पाहिली असतील. कुटुंबातल्या (family) सदस्यांमध्येही अधूनमधून खटके उडत असतात. ही भांडणं कधी-कधी एकमेकांच्या विचारांमध्ये असणाऱ्या फरकांमुळे होतात. बऱ्याच वेळा ही भांडणं (Quarrel) वास्तुदोषांमुळे (Vastu Dosh) होतात. वास्तुदोषाचे घरातल्या व्यक्तींच्या नात्यावर (Relationship) परिणाम होत असतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या वास्तू टिप्स (Vastu tips) सांगणार आहोत. त्या अंमलात आणून तुम्ही तुमच्या नात्यात गोडवा वाढवू शकता.  

1. जर तुम्ही विवाहित असाल, तर कधीही आग्नेय दिशेला दरवाजा असणाऱ्या रूममध्ये राहू नका. ते तुमच्या नात्यासाठी हानिकारक आहे. या दिशेला दरवाजा असलेल्या रूममध्ये राहिल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
2. बेडरूममध्ये हलके रंग वापरा. अनावश्यक वस्तूंनी तुमची रूम भरून ठेवू नका. अन्यथा त्या रूममध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते.
3. विवाहित जोडप्याने त्यांच्या रूममध्ये नैर्ऋत्य दिशेला एकत्र फोटो लावावा. एका कोपऱ्यात स्फटिक बॉल्सची जोडी ठेवा. असं केल्याने नात्यातला गोडवा वाढत असतो.
4. कुटुंब प्रमुखाची रूम नैर्ऋत्य दिशेला असावी. अशा रूममध्ये राहिल्यानं नाती चांगली राहतात.

5. तुम्ही ज्या बेडवर झोपता तो लाकडाचा असावा आणि तो चौकोनी असावा. अशी रचना नात्यांसाठी चांगली असते. झोपताना तुमचं डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेकडे असावेत. खराब डिझाइन केलेले बेड नात्यात तणाव निर्माण करू शकतात.
6. तुमच्या रूममध्ये एखादा आरसा असेल व त्यामध्ये झोपताना पती-पत्नीचा चेहरा दिसत असेल तर तो तुमच्या नात्यासाठी चांगला नाही. त्यामुळे असा आरसा झाकून ठेवा.

7. तुम्ही विवाहित असाल, तर तुमच्या बेडरूममध्ये सजावटीच्या वस्तू ठेवाव्यात. बेडरूममध्ये टीव्ही ठेवू नका. ते योग्य नाही.
8. बेडरूममध्ये तुमचा बेड दक्षिण किंवा नैर्ऋत्य दिशेला ठेवा. बेड एका तुकड्यात असावा. दोन वेगळे भाग जोडून बेड बनवू नका.
9. वास्तुशास्त्रानुसार पत्नीने नेहमी पतीच्या डावीकडे झोपावे. त्यामुळे पती-पत्नीचे नातं चांगले राहते.

10. तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही देवदेवतांचे किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो लावू नयेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी