Vastu Tips: वास्तूमधील उपाय करतील लग्न जमवण्यास मदत; झोपण्याच्या दिशेवरही अवलंबून आहे बाहुल्यावर चढण्याचा योग

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Oct 17, 2021 | 08:26 IST

वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी कोणती दिशा योग्य आहे, याची माहिती दिली आहे. जर आपण या दिशा लक्षात घेऊन कार्य करत राहू तर आपल्याला कोणत्याच कामात अपयश येणार नाही. 

Vastu remedies will help to get married,
Vastu Tips: योग्य दिशेला झोपल्यास लवकर जुळून येतो विवाह योग   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • वास्तूचे नियम लक्षात ठेवले नाहीत तर घरात वास्तू दोष निर्माण होतात.
 • झोपताना तुमचे पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिणेकडे नसावेत.
 • विवाहयोग्य मुलींच्या खोलीत फुलांचे चित्र काढणे शुभ आहे. फुले सौंदर्य, प्रेम आणि प्रणय यांचे प्रतीक आहेत.

नवी दिल्ली :  Vastu Tips For Marriage: वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी कोणती दिशा योग्य आहे, याची माहिती दिली आहे. जर आपण या दिशा लक्षात घेऊन कार्य करत राहू तर आपल्याला कोणत्याच कामात अपयश येणार नाही. वास्तूचे नियम लक्षात ठेवले नाहीत तर घरात वास्तू दोष निर्माण होतात.  दिशांची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जीचा प्रवाह उत्पन्न होऊ लागतो.

यामुळे आपल्या जीवनातील प्रगतीवर अडचण येऊ लागते, शिवाय अनेक संकटे येत असतात. या दोषांमुळे अनेक वेळा घरात शुभ कार्य लवकर होत नाहीत. अनेक लोकांच्या विवाह योगात अडचणी येत असतात. काही छोट्याशा कारणावरुन लग्न मोडून जात असते.  यामुळे आज आम्ही काही वास्तुशास्त्राच्या नियमांविषयी सांगणार आहोत. ज्याचे पालन केल्यानंतर या समस्यातून तुमची सुटका होईल.

वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले गेले आहेत जे वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. अशाच काही वास्तू उपायांबद्दल आपण आज जाणून घेऊया, ज्याचे पालन करून तुम्ही लग्नात येणारे अडथळे दूर करू शकता.

 1. - वास्तुनुसार, विवाह करण्यायोग्य मुलांनी कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेने झोपू नये. त्याचवेळी, अविवाहित मुलींनी उत्तर-पश्चिम दिशेने झोपावे. यामुळे लग्नाचा योग लवकर जुळून येतो. 
 2. - हे लक्षात ठेवा की झोपताना तुमचे पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिणेकडे नसावेत. 
 3. - लग्नायोग्य मुले किंवा मुलींची खोली हवेशीर आणि चांगली प्रकाशमान असावी. असे म्हटले जाते की अंधाऱ्या खोलीत राहणे किंवा झोपणे जीवनात नकारात्मकता आणते.
 4. - वास्तुनुसार झोपताना बेडवर गुलाबी चादर घालणे उत्तम. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. असे म्हटले जाते की या रंगाच्या बेडशीटवर झोपल्याने मनातील प्रेम आणि प्रेमाच्या भावना वाढतात.
 5. - जर मुलांच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्यांच्या खोलीच्या भिंती गुलाबी किंवा चमकदार पिवळ्या रंगाने रंगवल्या पाहिजेत. असे म्हटले जाते की हे दोन्ही रंग लग्नात येणारे अडथळे दूर करतात.
 6. - वास्तुनुसार, विवाहयोग्य मुलींच्या खोलीत फुलांचे चित्र काढणे शुभ आहे. फुले सौंदर्य, प्रेम आणि प्रणय यांचे प्रतीक आहेत. एवढेच नाही तर घराच्या ड्रॉईंग रूममध्ये फुलांचे पेंटिंग लावल्याने मुलींसाठी चांगले वैवाहिक संबंध येऊ लागतात.
 7. - अविवाहित मुला -मुलींनी काळे कपडे घालू नयेत. हे रंग नकारात्मकता आणि विरोधाचे रंग आहेत. वास्तुनुसार, या रंगाचे कपडे तुमच्या नात्यावर विपरीत परिणाम करतात.
 8. - लग्नायोग्य मुलांच्या किंवा मुलींच्या खोलीत एकापेक्षा जास्त दरवाजे नसावेत. वास्तु नुसार, एकापेक्षा अधिक दरवाजे असल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात आणि मनामध्ये दिशाभूल निर्माण करतात.
 9.  ज्यांना लग्नात अडचणी येत आहेत त्यांनी घरात केळीचे रोप लावावे आणि रोपाची रोज पूजा करावी. विष्णू जी केळीच्या रोपामध्ये राहतात, जे आपल्या लग्नाशी संबंधित समस्या त्वरित सोडवतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी