नवी दिल्ली : वास्तुशास्त्रामध्ये (Vaastu Shaastra) घराच्या प्रत्येक कोपऱ्याबाबत काही नियम सांगितले आहेत. ते नियम लक्षात घेऊन गोष्टी केल्या तर ते विशेष फलदायी ठरते. ड्रॉइंग रूम (drawing room), स्नानगृह (bathroom), पूजागृह (worship hall) तसेच स्वयंपाकघर यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात, जेणेकरून घराला वास्तुदोषांपासून वाचवता येईल. यासोबतच स्वयंपाकघरात कोणती भांडी ठेवणे शुभ मानले जाते. तसेच कोणत्या गोष्टी कुठे ठेवायला हव्यात. वास्तुनुसार स्वयंपाकघर व्यवस्थित नसेल तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यापासून वाचण्यासाठी वास्तूमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. चला तर मग या नियमांवर एक नजर टाकूया.