Lizard Dream Meaning In Marathi : स्वप्नात पाल दिसणे शुभ की अशुभ?

view a Lizard in a dream is auspicious or inauspicious? : आपल्याला स्वप्नात कधी पाल दिसली आहे का? स्वप्नात पाल दिसणे शुभ की अशुभ हा प्रश्न अनेकांसमोर आहे. आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या....

view a Lizard in a dream is auspicious or inauspicious?
स्वप्नात पाल दिसणे शुभ की अशुभ?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्वप्नात पाल दिसणे शुभ की अशुभ?
  • स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पाल कशाप्रकारे दिसली यावरून ते स्वप्न शुभ की अशुभ हे ठरते
  • स्वप्नाचा अर्थ भावी आयुष्याच्या नियोजनासाठी हिताचा

view a Lizard in a dream is auspicious or inauspicious? : आपल्याला स्वप्नात कधी पाल दिसली आहे का? स्वप्नात पाल दिसणे शुभ की अशुभ हा प्रश्न अनेकांसमोर आहे. आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या.... स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पाल कशाप्रकारे दिसली यावरून ते स्वप्न शुभ की अशुभ हे ठरते. 

जर आपण पालीला मारत आहात किंवा पालीला मारले आहे अशा स्वरुपाचे स्वप्न बघितले तर ते शुभ समजले जाते. यामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल. प्रगती होईल. रखडलेली कामं होतील.

जर आपल्याला बघून पाल घाबरली अथवा आपल्याला बघून पाल पळत आहे अशा स्वरुपाचे स्वप्न बघितले तर ते स्वप्न शुभ समजले जाते. हे स्वप्न म्हणजे आपली आर्थिक स्थिती आधीच्या तुलनेत आता उत्तम होत असल्याचे लक्षण आहे. आपली आर्थिक प्रगती होत असल्याचे ठोस निदर्शक आहे.

जर स्वप्नात आपल्याला घरात प्रवेश करत असलेली पाल दिसली तर ते स्वप्न अशुभ समजले जाते. असे स्वप्न बघितल्यास सावध राहावे. खर्च जपून करावा. तब्येत सांभाळावी. कायदे नियम यांचे काटेकोरपणे पालन करावे.

जर स्वप्नात आपण पालीला किडे मुंग्या खाताना बघितले तर ते स्वप्न अशुभ समजले जाते. असे स्वप्न बघितल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे हिताचे. आर्थिक अडचणी येण्याची शक्यता असते. या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आधीपासून सज्ज होणे फायद्याचे.

जर स्वप्नात आपण पालीचे पिल्लू अर्थात छोटी पाल पाल बघितली तर ते अशुभ समजले जाते. आपले एखादे महत्त्वाचे काम रखडण्याची शक्यता आहे. यामुळे सावध राहणे आणि गोड बोलून रखडलेले काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करणे हिताचे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी