घरबसल्या बघा ताजमहाल!

virtual tour of taj mahal पर्यटकांना ताजमहालला व्हर्च्युअल भेट देणे शक्य आहे. गूगलच्या एका टूलच्या मदतीने हे शक्य आहे.

virtual tour of taj mahal
घरबसल्या बघा ताजमहाल! 

थोडं पण कामाचं

  • घरबसल्या बघा ताजमहाल!
  • ३६० अंशांतून व्हर्च्युअल टूर
  • गूगलच्या एका टूलच्या मदतीने करा व्हर्च्युअल टूर

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे १५ मे पर्यंत ताजमहालसह देशातील सर्व ऐतिहासिक ठिकाणे आणि संग्रहालये पर्यटनासाठी बंद करण्यात आली आहेत. याआधी मागच्या वर्षीही सलग काही आठवड्यांसाठी देशातील सर्व ऐतिहासिक ठिकाणे आणि संग्रहालये पर्यटनासाठी बंद करण्यात आली होती. पण आता पर्यटकांना ताजमहालला व्हर्च्युअल भेट देणे शक्य आहे. गूगलच्या एका टूलच्या मदतीने हे शक्य आहे. virtual tour of taj mahal 

'वर्ल्ड हेरिटेज डे'च्या निमित्ताने युनायटेड नेशन्स एज्युकेशनल अँड सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने गूगलसोबत एक करार केला. यानंतर गूगलच्या एका टूलच्या मदतीने अनेक अनेक पर्यटनस्थळांना घरबसल्या भेट देणे शक्य झाले आहे. 

कोणत्याही व्यक्तीसाठी व्हर्च्युअल टूर हा एक अनोखा अनुभव आहे. गूगलने युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज अर्थात जागतिक वारसा हा दर्जा दिलेल्या दहा ठिकाणांच्या व्हर्च्युअल टूरची व्यवस्था केली आहे. यात भारतातील ताजमहाल या ठिकाणाचा समावेश आहे. https://artsandculture.google.com/story/zAUxtGbI2DyODQ या वेबसाइटला भेट देऊन ताजमहालची व्हर्च्युअल टूर करणे शक्य आहे. घरबसल्या वेगवेगळ्या कोनातून अगदी ३६० अंशांतून ताजमहालची व्हर्च्युअल टूर करणे शक्य आहे. तसेच https://artsandculture.google.com/project/explore-world-heritage या वेबसाइटला भेट देऊन ताजमहालसह जगातील वेगवेगळ्या ठिकाणांची ३६० अंशांतून व्हर्च्युअल टूर करता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी