Today in History: Tuesday, 9th August 2022 आज आहे मराठी रंगभूमीचे जनक विष्णूदास भावे यांचा स्मृतीदिन आणि संगीतसुर्य केशवराव भोसले यांची जयंती, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • मराठी रंगभूमीचे जनक विष्णूदास भावे यांचा स्मृतीदिन
 • मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला.
 • संगीतसुर्य केशवराव भोसले यांची जयंती.

Today in History: Tuesday, 9th  August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  (Vishnudas Bhave pioneer of Marathi theatre death anniversary know today in history 9th august 2022)

अधिक वाचा : Thoughts after Breakup : ब्रेकअप झाल्यामुळे एकटेपणा सतावतोय? या सोप्या टिप्स करतील जादू

९ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. २०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.
 2. १९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
 3. १९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
 4. १९७४: वॉटरगेट प्रकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
 5. १९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
 6. १९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.
 7. १९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्‍यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
 8. १८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
 9. ११७३: पिसाच्या मनोऱ्याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.

अधिक वाचा : Raksha Bandhan Sweet Recipes: रक्षाबंधनाला 15 मिनिटांत बनवा पारंपारिक पदार्थ, 'ही' आहे सोपी रेसिपी


९ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९७५: महेश बाबू - भारतीय अभिनेते आणि निर्माते
 2. १९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक - कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २८ एप्रिल १९९२)
 3. १८९०: केशवराव भोसले - गायक आणि नट (निधन: ४ ऑक्टोबर १९२१)
 4. १७७६: ऍॅव्होगॅड्रो - इटालियन रसायनशास्त्रज्ञ (निधन: ९ जुलै १८५६)
 5. १७५४: पिअर चार्ल्स एल्फांट - वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते (निधन: १४ जून १८२५)

अधिक वाचा : Vastu Tips: चुकीच्या दिशेस झोपल्याने पती-पत्नीमध्ये निर्माण होतो दुरावा, पाहा कोणत्या दिशेस झोपू नये...


९ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २०१५: कायर किन्हाण्णा राय - भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी (जन्म: ८ जून १९१५)
 2. २००२: शांताबाई दाणी - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: १ जानेवारी १९१८)
 3. १९९६: फ्रँक व्हाईट - जेट इंजिन विकसित करणारे (जन्म: १ जून १९०७)
 4. १९९६: फ्रँक व्हिटल - टर्बोजेट इंजिनचे शोधक (जन्म: १ जुन १९०७)
 5. १९७६: जान निसार अख्तर - ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)
 6. १९४८: हुगो बॉस - हुगो बॉस कंपनीचे संस्थापक (जन्म: ८ जुलै १८८५)
 7. १९०१: विष्णूदास अमृत भावे - मराठी रंगभुमीचे जनक
 8. ११७: ट्राजान - रोमन सम्राट (जन्म: १८ सप्टेंबर ५३)
 9. ११०७: होरिकावा - जपानी सम्राट (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)

अधिक वाचा : Raksha Bandhan ला तुमच्या बहिणींना द्या लाईफलाॅंग गिफ्ट, पाहा 5 सर्वोत्तम आर्थिक स्थैर्याच्या भेटवस्तू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी