नवी दिल्ली: मार्चचा (March) महिना हा वातावरणाच्या (climate) दृष्टीने उत्तम असतो. या महिन्यात वातावरण ना जास्त थंड (cold) असते ना जास्त गरम (hot). हा महिना सहली (trips) आणि पर्यटनाच्या (tourism) दृष्टीने फार चांगला मानला जातो. जर आपल्याला आपल्या सुट्ट्या (holidays) खास जागांवर घालवायच्या असतील तर आपण भारतातल्या या सुंदर आणि मनोहर ठिकाणांपैकी एक निवडू शकता. इथे आपल्याला सुंदर निसर्ग (nature) पाहायला मिळू शकतो.
ऊटी हे मधुचंद्रासाठी सर्वोत्तम जागांपैकी एक आहे. या शहराच्या चारी बाजूंना डोंगर आहेत. मार्चच्या महिन्यात इथे धुक्याची समस्या अजिबात येत नाही. या महिन्यात झऱ्याचे पाणी संपूर्ण स्वच्छ असते. आपण इथे ट्रेकिंग आणि हायकिंगही करू शकता.
कर्नाटकात असलेले गोकर्ण आपले सुंदर वातावरण आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मार्चच्या महिन्यात इथे खूप पर्यटक येतात. जर आपण सुट्ट्या घालवण्यासाठी उत्तम ठिकाण शोधत असाल तर गोकर्णचा विचार नक्की करा.
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान दलदलीतले हरण, पाणम्हैस, एकशिंगी गेंडा, हत्ती आणि अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. जर आपल्याला निसर्गाच्या जवळ राहायला आवडत असेल तर या ठिकाणाला भेट द्या.
कूर्ग या कर्नाटकातल्या प्रसिद्ध ठिकाणी मार्चच्या महिन्यात पर्यटकांची गर्दी होते. इथे चहाचे मळे आणि मसाल्याच्या बागा आहेत. मार्चमध्ये इथे पर्वतरांगांचे मनोहारी दर्शनही होते. आपल्या सुट्ट्या या ठिकाणी उत्तम जातील.
लदाख अनेक सुंदर पर्वतरांगांनी वेढलेले आहे. तिबेटियन शैलीचे किल्ले आणि महाल हे इथले सौंदर्य आणखी वाढवतात. याशिवाय इथली अद्भुत संस्कृतीही लोकांना आपल्याकडे आकर्षित करते.
हॅवलॉक बीच अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातला सर्वाधिक लोकप्रिय बीच आहे जिथे अनेक पर्यटक येतात. मार्च महिन्यात इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. इथे पाण्यात होणाऱ्या माशांच्या आणि जलप्राण्यांच्या हालचाली आणखी सुंदर दिसतात. इथे आपल्याला अनेक उष्णकटिबंधातले मासे दिसतील.
सिक्किममध्ये त्सोंगमो झरा, तीस्ता नदी, रेंजेट नदी अशा ठिकाणी अनेक मजेशीर हालचाली दिसतात. संध्याकाळी इथली थंड हवा आणि वातावरण आणखीच सुंदर होते. इथे आपण भारत आणि चीनची सीमा असलेल्या नथूला पासवर जाऊ शकता आणि छांगू झऱ्याचे सौंदर्यही आपल्याला मंत्रमुग्ध करते.
अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग हे छोटेसे गाव आहे जे अतिशय शांत आहे. मार्चच्या महिन्यात इथली शांतता अजून वाढते. इथे बर्फाच्छादित डोंगर मार्चच्या महिन्यात स्वच्छ दिसू लागतात.