तुमचं नशीब बदलायचं आहे? मग झोपण्यापूर्वी 'हे' करा उपाय, बदलेल तुमचं भाग्य

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Oct 10, 2021 | 12:25 IST

प्रत्येक व्यक्ती सुखमय जीवनाची अपेक्षा करत असतो. यासाठी तो व्यक्ती कठीण मेहनत घेत असतो. परंतु कधी-कधी असं होतं की, प्रचंड मेहनत घेऊनही आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही.  

Want to change your destiny Then do this remedy before going to bed,
तुमचं नशीब बदलायचं आहे? मग झोपण्यापूर्वी 'हे' करा उपाय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रात्री येणारी भयानक स्वप्न कशाप्रकारे घालवणार.
  • आंघोळीच्या पाण्यात गूळ, मध, हळद, मीठ मिसळा.

नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्ती सुखमय जीवनाची अपेक्षा करत असतो. यासाठी तो व्यक्ती कठीण मेहनत घेत असतो. परंतु कधी-कधी असं होतं की, प्रचंड मेहनत घेऊनही आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही.  मेहनत करुनही योग्य फळ मिळत नसल्याने अनेकजण नाराज होत असतात आणि आपल्या नशिबाला कोसत असतात. यामुळे ज्योतिष शास्त्रात सांगितलेले उपाय व्यक्तींनी केले पाहिजे. असे म्हटलं जातं की, छोट्या उपायांचा अवलंब केल्याने यश मिळते आणि समाजात आदर देखील वाढतो. या उपायांबद्दल जाणून घेऊया-

हे उपाय करा 

रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी करा:

रात्री झोपण्यापूर्वी, पाण्याने भरलेले भांडे बेडजवळ डोक्याच्या दिशेने ठेवावे.  सकाळी उठल्यावर हे पाणी घराबाहेर फेकून द्या. असे मानले जाते की असे केल्याने अनेक फायदे मिळतील. रात्री येणारी भयानक स्वप्ने थांबतील. आयुष्य आनंदी होईल. कुटुंबात येणारी नकारात्मक ऊर्जा संपेल. आदरात वाढही होईल.

आंघोळीच्या पाण्यात मिसळा या गोष्टी : 

सकाळी आंघोळीच्या पाण्यात गूळ, मध, हळद, मीठ यापैकी कोणतीही एक गोष्ट मिसळा. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मेहनतीनुसार तुम्हाला सर्व कामात यश मिळेल.

आंघोळ केल्यानंतर हे काम करा:

दररोज आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काही कुंकू मिसळा. कुंकू मिसळलेलं पाणी सूर्योदयाच्या वेळी सूर्य देवाला अर्ध अर्पण करा, यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. आयुष्य निरोगी होईल. दीर्घायुष्य प्राप्त होईल.

दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करा:

जे लोक दररोज दुर्गा सप्तशतीचा बारावा अध्याय पठण त्यांच्यावर मा दुर्गाची विशेष कृपा असते. त्याच्या कृपेने व्यक्तीला समाजात आदर आणि प्रसिद्धी  मिळते. यासह, व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी