Cheap Water Heater: महागड्या गीझरपासून होऊ शकते सुटका, फक्त 1500 रुपयांचं डिव्हाईस करतंय बाजरात क्रांती

आता पाणी गरम करण्यासाठीचा एक स्वस्तातला पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. केवळ दीड हजार रुपयांत हा गीझऱ विकत घेता येऊ शकतो आणि तो नळाला लावून गरम आणि थंड असे दोन्ही प्रकारचे पाणी तुम्ही तयार करू शकता.

Cheap Water Heater
महागड्या वॉटर हीटरपासून सुटका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महागातील गीझर अनेकांना परवडत नाहीत
  • बाजारात आलाय स्वस्तातील छोटा आणि मल्टिपर्पज हीटर
  • कुठल्याही नळाला जोडा आणि वापरा गरम पाणी

Cheap Water Heater: भांडी धुण्यासाठी, भाज्या धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठी आपल्याला गरम पाण्याची गरज असते. गॅसवर पाणी गरम करण्याऐवजी अनेकजण बाथरुममध्ये हीटर (water heater) बसवून घेणं पसंत करतात. वीजेवर चालणारे आणि गॅसवर चालणारे असे दोन्ही प्रकारचे गीझर बाजारात उपलब्ध असतात. सध्या थंडीचे दिवस सुरु होत असल्यामुळे या गीझरच्या मागणीत अधिकच वाढ होत असते. मात्र प्रत्येकालाच हे हीटर आणि गीझर परवडत नाहीत. त्याच्या भरमसाठ किंमतीमुळे अनेक गरीब कुटुंबात पारंपरिक पद्धतीनेच पाणी गरम केले जाते. मात्र आता पाणी गरम करण्यासाठीचा एक स्वस्तातला पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. केवळ दीड हजार रुपयांत हा गीझऱ विकत घेता येऊ शकतो आणि तो नळाला लावून गरम आणि थंड असे दोन्ही प्रकारचे पाणी तुम्ही तयार करू शकता. अमेझॉनसह काही ई-कॉमर्स वेबसाईटवर हा गीझर विक्रीसाठी उपलब्ध आहे. शिवाय बाजारपेठेत जाऊन दुकानातूनही तुम्ही हा गीझर खरेदी करू शकता. 

स्वस्तातील पर्याय

अमेझॉनवर या गीझरची किंमत 1299 रुपये ठेवण्यात आली आहे. इतर ठिकाणी थोड्याफार फरकाचे दीड हजारांच्या आतबाहेर हा गीझर आता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाला आहे. सेरेमिक आणि कॉपर मटेरियलचा वापर करून हा गीझर तयार झाला असून तुम्हाला हव्या त्या नळाला तुम्ही तो जोडू शकता. हे डिव्हाईस टाकीशी जोडण्याची गरज नसते. ज्या नळातून तुम्हाला गरम किंवा थंड पाणी यावे, असे वाटते, त्यालाच थेट हे डिव्हाईस जोडता येतं. त्यानंतर या डिव्हाईसच्या प्लगसाठी एक लाईटचे कनेक्शन लागते. 

अधिक वाचा - Hair Care Tips: केसांमधील कोंड्याच्या समस्येनं हैराण झालात?, मग अशा प्रकारे करा मेथीचा वापर

काही सेकंदांत थंड किंवा गरम पाणी

कंपन्यांनी केलेल्या दाव्यानुसार, या डिव्हाईसचा वापर करून काही सेकंदात पाणी गरम किंवा थंड करता येऊ शकतं. मात्र यात तुम्ही पाणी मिक्स करू शकत नाही. एका वेळी तुम्हाला एकतर गरम किंवा एकतर थंड पाणी हा पर्याय निवडावा लागेल. कंपनीच्या दाव्यानुसार एका मिनिटाला 2.4 लिटर गरम पाणी तर 3 लिटर थंड पाणी यातून बाहेर पडतं. भांडी घासणे, ब्रश करणे, दाढी करणे यासारख्या छोट्यामोठ्या गरजांसाठीदेखील तुम्ही याचा उत्तम वापर करू शकता. 

अधिक वाचा - Today in History, Sunday, 30th October 2022 : आज भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि शास्त्रज्ञ होमी भाभा यांचा जन्मदिन; साहित्यिक भाऊ पाध्ये यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

नळाला जोडा डिव्हाईस

तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही नळाला हे डिव्हाईस जोडू शकता आणि त्याचा वापर करू शकता. तुम्ही एका नळाचे काढून दुसऱ्या नळालाही ते गरजेप्रमाणे जोडू शकता. कमी बजेट असणाऱ्यांसाठी या डिव्हाईसचा शोध क्रांतीकारक मानला जात आहे. थंडीचा सीझन सुरु असताना बाजारात या उपकरणांची मागणी चांगलीच वाढत असल्याचं चित्र आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी