Ways to make money: लहान मुलांना सांभाळत महिला करू शकतात कमाई, हे आहेत पर्याय

आपल्या बाळाचा सांभाळ करता करता महिला अशी काही कामं करू शकतात, ज्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न सुरू होऊ शकतं. यामुळे आपल्या घरी राहून तुम्ही कमाईचा एक स्रोत सुरू करू शकता आणि स्वावलंबी होऊ शकता.

Ways to make money
लहान मुलांना सांभाळत कमाई करण्याचे पर्याय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मूल झाल्यानंतर अनेक महिला सोडतात नोकरी
  • काही वर्षांनी उभा राहतो उत्पन्नाचा प्रश्न
  • बाळाला सांभाळता सांभाळताच पैसे मिळवण्याचे आहेत अनेक पर्याय

Ways to make money: लहान मुलांचा सांभाळ करणं (Taking care of baby) ही एक मोठी जबाबदारी असते. आई होणं आणि बाळाचं संगोपन करणं हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक आव्हानात्मक काम असतं. अनेकदा महिला ही जबाबदारी पूर्णवेळ पार पाडण्यासाठी आपली नोकरीदेखील (Job) सोडतात किंवा आपल्या व्यवसायातून सुट्टी घेतात. मात्र यामुळे महिलांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत कमी होतो आणि त्या परावलंबी होऊ लागतात. छोट्यामोठ्या गोष्टींसाठी त्यांना इतरांकडे पैसे मागावे लागतात. काही वर्षांनी महिलांना ही बाब नकोशी वाटू लागते. मात्र सोडलेली नोकरी लगेच मिळणे किंवा ती पत्करणे अवघड असते. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला असतो. वास्तविक, आपल्या बाळाचा सांभाळ करता करता महिला अशी काही कामं करू शकतात, ज्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न सुरू होऊ शकतं. यामुळे आपल्या घरी राहून तुम्ही कमाईचा एक स्रोत सुरू करू शकता आणि स्वावलंबी होऊ शकता. जाणून घेऊया, घरबसल्या करण्याच्या कामाचे काही पर्याय.

बेबी सिटिंग

जर तुम्ही तुमच्या मुलाचा सांभाळ करत असाल, तर काही वेळासाठी इतरांच्या मुलांचा सांभाळही करू शकता. तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी घेण्याचा अनुभव असल्यामुळे ही तुमची जमेची बाजू ठरते. त्याचप्रमाणं तुमच्या घरात एक बाळ असल्याचं पाहून इतर पालक निर्धास्तपणे तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. दिवसातून तीन ते चार तास हे काम करून तुम्ही बऱ्यापैकी पैसे कमावू शकता. 

ट्यूशन

घरात बसून बसून तुम्ही बोअर होत असाल, तर तुम्ही ट्यूशन घेऊ शकता. लहान मुलांना शिकवणे, त्यांचा अभ्यास घेेणे, होमवर्क पूर्ण करून घेणे यासारखी कामं तुम्ही अगदी सहजपणे करू शकता. 

अधिक वाचा - How to make Curd: हिवाळ्यात दही होतं पातळ, वाचा घट्ट दह्यासाठी सोपे उपाय

हाउस रेंट

जर तुमचं घर मोठं असेल किंवा तुमच्या मालकीचे इतर काही फ्लॅट असतील, तर ते तुम्ही भाड्याने देऊ शकता आणि त्याच्या भाड्यातून कमाई करू शकता. तुम्ही शहरात राहत असाल, तर साधारणतः दहा ते वीस हजार रुपयांच्या आसपास तुमची कमाई होऊ शकते. 

ब्लॉगिंग

आजकाल ब्लॉगिंग हा उत्पन्नाचा एक उत्तम पर्याय बनला आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याशी संबंधित गोष्टींबाबत एक व्हिडिओ ब्लॉग तयार करून दररोज अपलोड करू शकता. काही दिवसांतच तुम्हाला त्यातून उत्पन्न मिळायला सुरुवात होऊ शकते. 

फ्रीलान्स लेखन

जर तुमच्याकडे लिहिण्याची कला असेल तर तुम्ही दरमहा 40 ते 50 हजार रुपये कमावू शकता. तुम्ही वेबसाईटवर प्रवास, पालकत्व, रिलेशनशिप यासारख्या तुमच्या आवडीच्या विषयावर लिहू शकता. 

अधिक वाचा - Mughal Food : मांसाहारीपेक्षा शाकाहारी भोजनावर मोगल सम्राटांचा होता भर

प्राण्यांचे पाळणाघर

जर तुम्हाला प्राण्यांची आवड असेल तर तुम्ही प्राण्यांचं पाळणाघर सुरू करू शकता. लोक काही तासांसाठी तुमच्याकडे त्यांच्या प्राण्यांना ठेवून जाऊ शकतात. त्यातून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. 

प्रूफिंग

जर तुमची एखाद्या भाषेवर चांगली पकड आणि प्रभुत्व असेल, तर त्या भाषेतील प्रूफ रिडिंगची कामं तुम्ही मिळवू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी